महाराष्ट्राची परंपरा असलेल्या वारकरी दिंडीला धोंडू चिंदरकर यांच्यामुळे व्यासपीठ

भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली; केंद्रीयमंत्री नारायण राणे वाढदिवस निमित्त आयोजित केली दिंडी भजन नृत्य स्पर्धा

मालवण ता.१५-:* वारकरी दिंडी नृत्य ही महाराष्ट्राची परंपरा आहे. ही परंपरा जोपासणाऱ्या कलाकारांना एक मोठे व्यासपीठ मिळवून देण्याच्या हेतूने भाजप तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर व सहकारी यांच्या संकल्पनेतुन आयोजित करण्यात आलेली दिंडी भजन नृत्य स्पर्धा खऱ्या अर्थाने लक्षवेधी ठरली आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वाढदिवसा निमित्त गेल्या पाच दिवसात जिल्हाभरात अनेक सामाजिक उपक्रम राबविण्यात आले.

त्यापैकी चिंदर गावात आयोजित करण्यात आलेली पारंपरिक दिंडी भजन नृत्य स्पर्धा नाविन्यपूर्ण ठरली. सर्वच कलाकारांचे व आयोजकांचे कौतुक करावे तेवढे कमी. असे कौतुकोद्गार भाजप जिल्हाध्यक्ष माजी आमदार राजन तेली यांनी चिंदर येथे बोलताना व्यक्त केले. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून गेले पाच दिवस विविध सामाजिक उपक्रम जिल्हाभरात राबवण्यात आले. मालवण तालुक्यातील विविध उपक्रमांचा सांगता सोहळा चिंदर माऊली मंदिर येथील व्यासपीठ ठिकाणी आयोजित जिल्हास्तरीय पारंपरिक दिंडी नृत्य स्पर्धा व जिल्हाबँक अध्यक्ष मनीष दळवी यांच्या सत्कार सोहळ्याने संपन्न झाला. मालवण तालुक्यात २९ पैकी १८ विकास सोसायटी निवडणुकीत विजयी झालेल्या चेअरमन, व्हाईस चेअरमन व संचालक यांचाही सत्कार या निमित्ताने करण्यात आला.

या कार्यक्रमात भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली, भाजप प्रदेश सचिव माजी आमदार प्रमोद जठार, सिंधुदुर्ग जिल्हा बँक संचालक मनिष दळवी, भाजप जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, उद्योजक दिपक परब, सरपंच राजश्री कोदे, विलास हडकर, गणेश कुशे, विजय केनवडेकर, माजी सभापती अमरे, जि. प. सदस्य जेराँन फर्नांडिस, किसान मोर्चा अध्यक्ष उमेश सावंत, मुंबई घाटकोपर माजी नगरसेवक सुरेश गोलतकर, श्री. पारकर, श्री. गावडे यासह सोसायटी चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक व अन्य मान्यवर तसेच तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, तंटामुक्ती अध्यक्ष संतोष गांवकर, उपसरपंच दिपक सुर्वे, ग्रा.प. सदस्य शशी नाटेकर, सानिका चिंदरकर, सोसायटी चेअरमन देवेंद्र हडकर, मनोज हडकर, उद्योजक प्रकाश मेस्री, दिगंबर जाधव, सुनिल पवार, मोरेश्वर गोसावी, अरुण घाडी, रवि घागरे, परेश चव्हाण, विश्वास खरात, रवी गावडे, आप्पा गावडे, रणजित, समीर बावकर, यासह अन्य भाजप पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. श्री. भालचंद्र केळुसकर व ऍड. दिलीप ठाकूर यांनी स्पर्धेचे परीक्षण केले.

तर राजा सामंत यांनी सूत्रसंचालन केले. स्पर्धेत देवगड, मालवण येथील दहा संघांनी सहभाग दर्शवला. सर्व संघाना मान्यवरांच्या हस्ते विशेष सन्मानित करण्यात आले. यावेळी तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर म्हणाले आपल्या सभापती कार्यकाळात आचरा महोत्सव सारखा भव्यदिव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्याच धर्तीवर एखादा सामाजिक स्तरावरील मोठा कार्यक्रम करावा या भावनेतून या कार्यक्रमाची संकल्पना पुढे आली.

या कार्यक्रमाचे श्रेय सर्वांचे आहे. त्या बरोबर तालुक्यात ज्या विकास सोसायटी भाजपच्या ताब्यात आल्या आज त्या सर्वांचा सत्कार होत आहे. त्याचे श्रेय ही भाजप सर्व पदाधिकारी कार्यकर्ते व ग्रामस्थ यांचे आहे. मी निमित्तमात्र आहे. ना. राणे वाढदिवसा निमित्ताने एक मोठा कार्यक्रम व्हावा. या हेतूने आयोजित केलेल्या कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. याचे समाधान आहे. यापुढेही सामाजिक कार्य चालू ठेवून राणे यांनी मंत्री खात्याच्या माध्यमातून अधिकाधिक रोजगार उद्योग उपलब्ध करण्याचा आपला प्रयत्न राहील.

असेही चिंदरकर म्हणले. आम्ही राणे साहेबांचे कार्यकर्ते हा आमचा अभिमान : अशोक सावंत केंद्रीय मंत्री राणे हे उतुंग नेतृत्व आहे. आम्ही त्यांचे कार्यकर्ते हा आमचा अभिमान आहे. प्रत्येक कार्यकर्त्यांच्या सहभागातून त्यांचा प्रत्येक वाढदिवस हा भव्य होतो. आजचा कार्यक्रमही भव्यदिव्य झाला. आगामी काळात केंद्रीय मंत्री राणे यांच्या मंत्रिपदाचा माध्यमातून उद्योग, उद्योजक आणि विकासाची गंगा सिंधुदुर्गात असेल. असा विश्वास जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत यांनी व्यक्त केला. सिंधुदुर्गात मोठे उद्योजक बनतील : प्रमोद जठार सर्वसामान्य जनतेचे हित हे धोरण ठरवून भाजपच्या माध्यमातून विकास योजना अगदी तळागळापर्यत पोहोचवल्या जात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठे रोजगार व उद्योजक निर्माण करणाऱ्या खात्याची जबाबदारी नारायण राणे यांच्याकडे दिली आहे. या माध्यमातून मोठे उद्योजक सिंधुदुर्गातही तयार होतील. असा विश्वास माजी आमदार प्रमोद जठार यांनी व्यक्त केला. त्या बरोबर विकासाला खीळ घालण्याचे काम नाणार सी वर्ल्ड सारख्या प्रकल्पाना विरोध करून शिवसेनेने केले असा आरोपही यावेळी करण्यात आला.

You cannot copy content of this page