मालवण ता.१५-:* मालवण धुरीवाडा येथील श्रीकृष्ण मंदिरात श्रीकृष्ण मूर्तीची पुनः प्राण प्रतिष्ठापना करण्यात आल्यावर आज शुक्रवारी जुन्या मूर्तीचे वाजतगाजत आणि हरी नामाच्या जयघोषात मालवण चिवला बीच येथील समुद्रात विसर्जन करण्यात आले. मालवण धुरीवाडा येथील श्रीकृष्ण मंदिरात श्रीकृष्ण मूर्तीची पुनः प्राण प्रतिष्ठापना आणि कलशारोहण सोहळा दिमाखात आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
यावेळी मंदिरातील श्रीकृष्णाच्या जुन्या मूर्तीच्या जागी नव्या मूर्तीची पुनः प्राण प्रतिष्ठपना सर्व धार्मिक विधींसह करण्यात आली. त्यानंतर आज श्रीकृष्णाच्या जुन्या मूर्तीची मंदिर ते चिवला किनाऱ्यापर्यंत ढोल ताशांच्या गजरात वाजतगाजत मिरवणूक काढून मूर्तीचे समुद्रात विसर्जन करण्यात आले.
यावेळी श्रीकृष्ण सेवा मंडळाचे अध्यक्ष दत्तात्रय केळुसकर, आनंद जामसंडेकर, निशा जामसंडेकर, माजी नगरसेविका दर्शना कासवकर, शिवाजी केळुसकर, सचिन गोवेकर, वसंत गावकर, नारायण पडेलकर, मनोज मेथर, रोहित मेथर, संजय कासवकर, आबा शिर्सेकर, दया शिर्सेकर, भाई कासवकर, माजी नगरसेवक दीपक पाटकर, भाजप किसान मोर्चा तालुकाध्यक्ष महेश सारंग, तुळशीदास गोवेकर, मंदार गोवेकर, विशाल गोवेकर यांसह धुरीवाडावासीय, महिला व भाविक उपस्थित होते.
