अखेर पंचशील नगर परिसरातील विकास कामांचा शुभारंभ…

सेवानिवृत्त सहा.पोलिस निरीक्षक विजय कदम यांनी केला पाठपुरावा

देवगड ता.१५-:* देवगड जामसंडे नगरपंचायत हद्दीतील देवगड किल्ला पंचशील नगर याठिकाणी संपूर्ण पंचशील नगर परिसरातील गल्लीबोळात बंदिस्त गटार व त्यावर सिमेंट काँक्रीट रोड तयार करणे याबाबतची मागणी केली वर्षभर होत होती. परंतु या कामाचा पाठपुरावा करून मंजुरी मिळवणे या कामाचा शुभारंभ करण्यात आला नव्हता.

सेवानिवृत्त सहा. पोलीस निरीक्षक विजय कदम यांनी या कामाचा पाठपुरावा करून १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून या कामाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी नगराध्यक्ष साक्षी सावंत,उपनगराध्यक्ष मिताली सावंत, नगरसेवक निवृत्ती तारी, संतोष तारी, रोहन खेडेकर नितीन बांदेकर,देवगड बौद्धजन विकास मंडळाचे उपाध्यक्ष आनंद देवगडकर ,संतोष कदम ,विठ्ठल देवगडकर, दिलीप देवगडकर, विजय सावंत ,सचिव राजदीप कदम मंडळाचे महिला पुरुष सभासद यांच्या उपस्थितीत मंडळाचे अध्यक्ष विजय कदम यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.

You cannot copy content of this page