फोंडाघाट महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रम

कणकवली ता.१६-:* कला आणि वाणिज्य महाविद्यालय फोंडाघाटमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रम संपन्न झाला. या निमित्ताने महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विद्यार्थी विषयक विचार या विषयावर निबंध स्पर्धा तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर: एक सामाजिक चळवळ या विषयावर वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या.      या कार्यक्रमाच्या प्रारंभी महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. संतोष रायबोले यांनी महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व भगवान महावीर यांच्या प्रतिमेस अभिवादन केले. 

कार्यक्रमाला प्रमुख वक्ते डॉ. डी. बी. ताडेराव उपस्थित होते. आपल्या व्याख्यानात या महामानवाच्या संयुक्त जयंती कार्यक्रमाचे कौतुक करून या महान व्यक्तींच्या सामाजिक कार्याचा आढावा घेताना ते म्हणाले की, अशा अलौकिक महात्म्यांच्या विचार व कर्तृत्वामुळेच आपला भारत विविधतेने नटलेला दिसतो आहे आणि तो चिरंतन एकसंघ राहू शकतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्याय ही मानवी मूल्ये जगाला दिली.

जगाच्या शांतीसाठी माणुसकीचा धर्म स्वीकारण्याचे आवाहन त्यांनी केले. भारतातील सामाजिक न्यायाचा लढा ते यशस्वीपणे लढले. आणि भारतीय संविधाना सारखे मौल्यवान विचार आपल्या हाती त्यांनी दिले.      यानिमित्त घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेत रसिका संजय पांचाळ प्रथम, ऐश्वर्या विनोद गुरव दितीय, तर दिपाली मंगेश जाधव तृतीय क्रमांक तसेच वक्तृत्व स्पर्धेत अमिशा अनिल चव्हाण प्रथम, साक्षी संजय रासम व्दितीय, पूर्वा अंबाजी रासम तृतीय क्रमांक पटकावला.        कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व कर्मचारी वर्ग व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

You cannot copy content of this page