Headlines

सावंतवाडी पोलिसांची मनसैनिकांना नोटीस…

सावंतवाडी ता.०४-:* मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे उतरवण्याबाबत आक्रमक भूमिका घेतली आहे. राज ठाकरे यांनी औरंगाबाद येथे नुकतीच पार पडलेल्या सभेत भोंगे उतरवण्याबाबत राज्य सरकारला इशारा दिला होता. त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कोणत्याही प्रकारचे पडसाद उमटू नये,याची खबरदारी घेण्यासाठी पोलिसांनी मनसे पदाधिकाऱ्यांना नोटिसा काढल्या आहेत. मनसेचे राजू कासकर,आशिष सुभेदार,अनिल केेसरकर, यासह कार्यकर्त्यांना नोटीस काढली…

Read More

वीज तारांचा स्पर्श होऊन झालेल्या शॉर्टसर्किटमुळे माडाला आग…

मालवण दि प्रतिनिधी मालवण शहरातील भंडारी हायस्कुल समोरील रस्त्यावर झाट्ये यांच्या जागेतील माडाच्या झावळांचा जवळच असलेल्या वीज पोलावरील वीज तारांना स्पर्श होऊन झालेल्या शॉर्टसर्किट मुळे माडाला आग लागल्याची घटना आज मंगळवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली. वाऱ्यामुळे ही आग मधून मधून भडकत राहिल्याने तसेच आगीच्या ज्वाळा व किटाळ रस्त्यावर पडू लागल्याने या मार्गावरील वाहतूक काही…

Read More

श्री क्षेत्र कुणकेश्वर येथे ६ ते ८मे पर्यटन महोत्सवाचे आयोजन

देवगड ता.०३-:* दक्षिण कोकणची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र कुणकेश्वर याठिकाणी दिनांक ६मे ७ मे आणि ८ मे या तीन दिवसाच्या कालावधीत पर्यटन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.अशी माहिती कुणकेश्वर पर्यटन महोत्सव समिती अध्यक्ष प्रसाद गोडबोले यांनी कुणकेश्वरभ क्तनिवास येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली . यावेळी श्री कुणकेश्वर देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष संतोष लब्दे,सरपंच…

Read More

पीएसआय शिवराज झांझुर्णे यांची मालवण पोलीस ठाणे येथे नियुक्ती

मालवण ता.०३-:* मालवण पोलीस ठाणे येथे परिविक्षाधीन कालावधीसाठी पीएसआय शिवराज अशोक झांझुर्णे (वय ३४) यांची नियुक्ती सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी केली आहे. सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तडवळे येथील शिवराज झांझुर्णे हे पीएसआय म्ह्णून नुकतेच सिंधुदुर्ग पोलीस दलात दाखल झाले. पोलीस अधीक्षक यांच्या आदेशाने २ मे रोजी त्यांची मालवण पोलीस ठाणे येथे नियुक्ती करण्यात आली…

Read More

वायरी गर्देरोडवरील धोकादायक वळणावर गार्ड बसविण्याचे काम अपूर्णावस्थेत

*⚡मालवण ता.०२-:* मालवण नगरपालिका प्रभाग ८ मधील वायरी गर्देरोड येथे गोवेकर घरानजीक असलेल्या धोकादायक वळणावर महिन्याभरापूर्वी सुरू केलेले लोखंडी सुरक्षागार्ड बसविण्याचे काम अपूर्णावस्थेत असल्याने याबाबत नागरिकांनी नगरपालिका प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. हे काम त्वरित पूर्ण करण्यात यावे अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. वायरी गर्देरोड येथे गोवेकर घरानजीक असलेल्या व्हाळीच्या कडेने जाणाऱ्या धोकादायक वळणाच्या रस्त्यावर अपघातांचे…

Read More

घुमडे शाळेच्या शिक्षिका सौ. सरिता नाईक- भाबल यांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

मालवण ता.०३-:* महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षकभारती मालवणच्या वतीने घुमडे शाळेच्या शिक्षिका सौ. सरिता नाईक- भाबल यांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. शिक्षक भारतीच्या जिल्हा महिला आघाडी सरचिटणीस सौ. वैशाली गर्कळ यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. ओमसाई गणेश कार्यालय, कट्टा येथे झालेल्या कार्यक्रमात सौ. सरिता नाईक यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी मालवण पंचायत…

Read More

सेवांगणतर्फे दशावतार नाट्य महोत्सवाचे आयोजन

*⚡मालवण ता.०३-:* मालवण येथील बॅ. नाथ पै सेवांगण तर्फे बॅ. नाथ पै यांच्या जन्मशताब्दी वर्षा निमित्त ६ ते १० मे या कालावधीत दशावतार नाट्य महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये दि. ६ रोजी वालावलकर पारंपारिक दशावतार नाट्य मंडळ, ओसरगाव यांचे ‘क्रोधमाला’ नाटक, ७ रोजी महापुरुष दशावतार नाट्य मंडळ सावंतवाडी यांचे ‘प्रलयकारी गणेश’ नाटक, ८ रोजी…

Read More

गोव्याचा विजय कार्यकर्ते व जनतेचा

पुन्हा सत्ता येणार असल्याचा व्यक्त केला होता विश्वास;भाजप गोवा प्रदेशाध्यक्ष सदानंदशेठ तानवडे सावंतवाडी : गोव्यातील विजय हा सर्व सामान्य कार्यकर्त्यांचा आणि जनतेचा विजय आहे.गोव्यात भाजपचे सरकार येणार हे मी पूर्वीच सांगितले होते.सर्व वरिष्ठ नेत्यांनी आमच्यावर विश्वास दाखवला त्यामुळेच हे सर्व शक्य झाले असे मत गोव्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंदशेठ तानवडे यांनी व्यक्त केले.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी गोव्यात…

Read More

शिशुविहार काळे आजींच्या बालवाडीतील पहिलीत जाणाऱ्या शिशुंचा निरोप समारंभ संपन्न

मालवण ता.०३-:* मालवण येथील टोपीवाला हायस्कुल मध्ये चालणाऱ्या शिशुविहार- काळे आजींच्या बालवाडीतील पहिलीत जाणाऱ्या शिशुंचा निरोप समारंभ मोठ्या उत्साहात विविध कार्यक्रमांनी संपन्न झाला. यानिमित्त मुलांनी सहल व वनभोजन, वेशभूषा व नृत्य करत धमाल मजामस्ती केली. तर मुख्य निरोप समारंभात मुलांना खाऊ वाटप करून त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. शिशुविहार काळे आजींच्या बालवाडीत शैक्षणिक…

Read More

जातीच्या दाखल्यांबाबत गाबित समाजाला न्याय देण्याची शासनाकडे मागणी

मालवण ता.०३-:* जात पडताळणी आणि जातीचे दाखले मिळवण्यासाठी गाबित समाज बांधवांना येत असलेल्या अडचणींबाबत तांत्रिक मार्गदर्शनासाठी कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडी प्रांताधिकाऱ्यांसमवेत देवगड, मालवण, वेंगुर्ले आणि सावंतवाडी येथे बैठक आयोजित करण्यात यावी. यासंदर्भात महसूल आणि जात पडताळणी विभागाने संयुक्तपणे लवकरात लवकर कार्यवाही करून गाबित समाजातील लोकांवर होत आसलेला अन्याय दूर करावा, अशी मागणी मालवण तालुका गाबित…

Read More
You cannot copy content of this page