मालवण ता.०३-:* महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षकभारती मालवणच्या वतीने घुमडे शाळेच्या शिक्षिका सौ. सरिता नाईक- भाबल यांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. शिक्षक भारतीच्या जिल्हा महिला आघाडी सरचिटणीस सौ. वैशाली गर्कळ यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
ओमसाई गणेश कार्यालय, कट्टा येथे झालेल्या कार्यक्रमात सौ. सरिता नाईक यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी मालवण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी जयेंद्र जाधव, गटशिक्षणाधिकारी संजय माने, शिक्षक भारती राज्य संघटक किसन दुखंडे, जिल्हा संघटक रामचंद्र डोईफोडे, जिल्हा अध्यक्ष संतोष पाताडे, तालुका अध्यक्ष संतोष कोचरेकर, सचिव संतोष परब, महिला आघाडी तालुकाध्यक्ष सौ. शीतल परुळेकर, महिला आघाडी सचिव सौ. सेजल परब, प्रतिनिधी दिनकर शिरवलकर, कृष्णा कालकुंद्रीकर, सिद्धार्थ नेरुरकर, लहू पाटील व अन्य मान्यवर उपस्थित होते. यावेळी सौ. सरिता नाईक यांच्यासोबत पोईप शाळेचे शिक्षक विनोद पवार, मसुरे नं. १ शाळेचे शिक्षक गुरुनाथ ताम्हणकर, तळगाव नं.१ शाळेचे शिक्षक विनायक जंगले, हडी कोथेवाडा शाळेच्या शिक्षिका श्रीमती मैना कारंडे यांना आदर्श शिक्षक तर शाळा हडी नं. १, धामापूर बौद्धवाडी, कोळंब कातवड, असरोंडी उत्तर विभाग, चिंदर पालकर वाडी या शाळांना आदर्श शाळा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. या शिक्षकांना सन्मानपत्र, स्मृतिचिन्हे देऊन सन्मानित करण्यात आले. शिक्षक भारती तर्फे घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती सराव परीक्षा, नवोदय सराव परीक्षा, ‘मी ही शिक्षक होणार’ जिल्हास्तरीय स्पर्धा अशा विविध स्पर्धांमधील विजेत्या विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले.
