सेवांगणतर्फे दशावतार नाट्य महोत्सवाचे आयोजन

*⚡मालवण ता.०३-:* मालवण येथील बॅ. नाथ पै सेवांगण तर्फे बॅ. नाथ पै यांच्या जन्मशताब्दी वर्षा निमित्त ६ ते १० मे या कालावधीत दशावतार नाट्य महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.

यामध्ये दि. ६ रोजी वालावलकर पारंपारिक दशावतार नाट्य मंडळ, ओसरगाव यांचे ‘क्रोधमाला’ नाटक, ७ रोजी महापुरुष दशावतार नाट्य मंडळ सावंतवाडी यांचे ‘प्रलयकारी गणेश’ नाटक, ८ रोजी नाईक मोचेमाडकर पारंपारिक दशावतार लोक नाट्य मंडळ मोचेमाड यांचे ‘चैत्र शुद्ध’ नाटक, ९ रोजी खानोलकर पारंपारिक दशावतार नाट्य मंडळ खानोली- वेंगुर्ले यांचे ‘विक्रमासुर लावण्यवती’ नाटक, १० रोजी ओम वीरभद्र दशावतार नाट्यमंडळ भांडुप मुंबई यांचे ‘वृंदा जलधर’ नाटक सादर होणार आहे. हे सर्व नाट्यप्रयोग सायंकाळी ७ वाजता सेवांगण, धुरीवाडा मालवण येथे होणार आहेत. तरी नाट्य रसिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page