वायरी गर्देरोडवरील धोकादायक वळणावर गार्ड बसविण्याचे काम अपूर्णावस्थेत

*⚡मालवण ता.०२-:* मालवण नगरपालिका प्रभाग ८ मधील वायरी गर्देरोड येथे गोवेकर घरानजीक असलेल्या धोकादायक वळणावर महिन्याभरापूर्वी सुरू केलेले लोखंडी सुरक्षागार्ड बसविण्याचे काम अपूर्णावस्थेत असल्याने याबाबत नागरिकांनी नगरपालिका प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. हे काम त्वरित पूर्ण करण्यात यावे अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

वायरी गर्देरोड येथे गोवेकर घरानजीक असलेल्या व्हाळीच्या कडेने जाणाऱ्या धोकादायक वळणाच्या रस्त्यावर अपघातांचे प्रमाण वाढले होते. याबाबत स्थानिक नागरिकांनी तत्कालीन नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, तत्कालीन नगरसेविका तृप्ती मयेकर, सेजल परब, पंकज साधये यांचे लक्ष वेधत या वळणावर संरक्षक कठडा उभारण्याची मागणी केली होती.

त्यानुसार महिनाभरापूर्वी माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर आणि शिवसेनेच्या माजी नगरसेवकांच्या प्रयत्नांमुळे या वळणावर सुरक्षागार्ड बसवण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली होती. मात्र हे काम बहुतांशी पूर्ण झाले असले तरी वळणाच्या मुख्य कोपऱ्याच्या ठिकाणी अद्याप गार्ड बसविण्यात आलेला नाही. त्यामुळे या अपूर्णावस्थेतील कामाबाबत नागरिकांनी नाराजी व्यक्त केली असून लवकरात लवकर हे काम पूर्ण करावे अशी मागणी केली आहे.

You cannot copy content of this page