सावंतवाडी ता.०४-:* मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे उतरवण्याबाबत आक्रमक भूमिका घेतली आहे. राज ठाकरे यांनी औरंगाबाद येथे नुकतीच पार पडलेल्या सभेत भोंगे उतरवण्याबाबत राज्य सरकारला इशारा दिला होता. त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कोणत्याही प्रकारचे पडसाद उमटू नये,याची खबरदारी घेण्यासाठी पोलिसांनी मनसे पदाधिकाऱ्यांना नोटिसा काढल्या आहेत. मनसेचे राजू कासकर,आशिष सुभेदार,अनिल केेसरकर, यासह कार्यकर्त्यांना नोटीस काढली आहे. कायदा सुव्यवस्थेस बाधा आणण्याचे किंवा दखलपात्र अदखलपात्र गुन्ह्यासारखे कोणतेही कृत्य घडून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास कायदेशीर कारवाई करणार असल्याचे नोटीस मध्ये म्हटले आहे.
सावंतवाडी पोलिसांची मनसैनिकांना नोटीस…
