वीज तारांचा स्पर्श होऊन झालेल्या शॉर्टसर्किटमुळे माडाला आग…

मालवण दि प्रतिनिधी मालवण शहरातील भंडारी हायस्कुल समोरील रस्त्यावर झाट्ये यांच्या जागेतील माडाच्या झावळांचा जवळच असलेल्या वीज पोलावरील वीज तारांना स्पर्श होऊन झालेल्या शॉर्टसर्किट मुळे माडाला आग लागल्याची घटना आज मंगळवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली. वाऱ्यामुळे ही आग मधून मधून भडकत राहिल्याने तसेच आगीच्या ज्वाळा व किटाळ रस्त्यावर पडू लागल्याने या मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.

या आगीमुळे शहरातील वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता. यावेळी वीज वितरणचे कर्मचारी आणि स्थानिक नागरिक आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी आणि वीज पुरवठा पूर्ववत प्रयत्न करत करत होते. दरम्यान, यापूर्वीही याच ठिकाणी विद्युत तारांचा स्पर्श होऊन एक माड जळल्याची घटना घडली होती. आता पुन्हा तशाचप्रकारे माडाला आग लागल्याने नागरिकांमधून चिंता व्यक्त होत आहे. वीज पोलांच्या जवळ असणारे माड अथवा झाडे तसेच माडांच्या जवळून गेलेल्या वीज तारा याबाबत वीज वितरण प्रशासनाने योग्य ती उपाययोजना करावी अशी मागणी होत आहे.

You cannot copy content of this page