Headlines

रेल्वेची स्थिती दाखविणारा फलक व रिझर्वेशन चार्ट फलाट क्रमांक १ वर पूर्वीप्रमाणे लावा

संतोष नाईक यांची रेल्वे प्रशासनाकडे निवेदनाद्वारे मागणी कणकवली ता.०५-:* कणकवली रेल्वे स्थानकावरती येणाऱ्या प्रवाश्यांच्या सोईसाठी रेल्वेची स्थिती दाखविणारा फलक व रिझर्वेशन चार्ट फलाट क्रमांक १ वर लावण्यात येत होता.परंतु त्याची जागा बदलल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे.पूर्वीप्रमाणे पहिल्याच ठिकाणी ही सुविधा उपलब्ध करण्यात यावी अशी आग्रही मागणी ह्यूमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष संतोष नाईक…

Read More

सिंधुरत्न टॅलेंट सर्च परीक्षेत भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळेतील विद्यार्थ्यांचे नेत्रदीपक यश….

सावंतवाडी ता 5 : युवा संदेश प्रतिष्ठान नाटळ सांगवे आयोजित सिंधुरत्न टॅलेंट सर्च जिल्हास्तरीय स्पर्धा परीक्षेत भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळा चराठे नं 1 च्या विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक यश संपादन केले आहे. या शाळेतील तिसरी तील तीन विद्यार्थी जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीत चमकले असून तिसरीतील एक विद्यार्थिनी तालुका गुणवत्ता यादीत आली आहे तसेच इतर सात विद्यार्थ्यांना…

Read More

वेंगुर्ला सातेरी वर्धापनदिन ७ व ८ मे रोजी

वेंगुर्ला ता.०५-:* वेंगुर्ला येथील ग्रामदेवी श्री सातेरीचा वार्षिक वर्धापनदिन सोहळा ७ व ८ मे रोजी संपन्न होत आहे. यानिमित्त दि.७ रोजी धार्मिक विधी, सकाळी ९ व. कुंकूमार्चन, सायं.७ वा. सद्गुरुनाथ मंडळ तुळस यांचे भजन, रात्रौ ८ वा. केपादेवी वारकरी मंडळ उभादांडा यांचे भजन, दि.८ रोजी सकाळी ९ वा. श्रीसत्यनारायण महापूजा, दु. १२ वा. महाआरती, तिर्थप्रसाद,…

Read More

ब्रेन डेव्हलपमेंटमध्ये सानवी सातार्डेकरचे यश

वेंगुर्ला प्रतिनिधी- वेंगुर्ला येथील एम.आर.देसाई इंग्लिश मिडियम स्कूलची विद्यार्थीनी सानवी मनिष सातार्डेकर हिने २०२०-२१ या वर्षामध्ये घेतलेल्या ऑल इंडिया ब्रेन डेव्हलपमेंट परीक्षेमध्ये सुवर्ण पदकासोबत ५३वा नंबरही पटकाविला आहे. कु. सानवी हिने गणित विषयात ५० पैकी ५० गुण प्राप्त केले असून ऑल इंडियामधील पहिल्या शंभर विद्यार्थ्यांमध्ये तिचा समावेश आहे. तिला स्कूल मधील सर्व शिक्षकांसोबतच डॉ.मानसी सातार्डेकर…

Read More

कोसेसाव फर्नांडीस यांचा सेवानिवृत्तीपर सत्कार

वेंगुर्ले ता.०५-:* वेंगुर्ला येथील मदर तेरेसा स्कूलमध्ये लहान मुलांच्या सेवेसाठी ‘आया‘ या पदावर कार्यरत असलेल्या कोसेसाव मार्यान फर्नांडिस यांचा सेवानिवृत्तपर सत्कार कार्यक्रम १ मे रोजी पार पडला. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि द सिधुदुर्ग डायोसिसन एज्युकेशनल ट्रस्टचे सचिव फादर अॅड.मॅन्यूएल डिसिल्व्हा, सिधुदुर्ग धर्मप्रांताचे विकर जनरल प्रशालेचे व्यवस्थापक आणि इमॅक्युलेट कन्सेप्शन चर्चचे प्रमुख धर्मगुरु फादर अॅण्ड्रयू…

Read More

मळगाव शारदा विद्यालयाचा इयत्ता चौथीचा निरोप समारंभ शिक्षकांच्या उपस्थितीत संपन्न…

सर्व विद्यार्थ्यांनी शाळेतील जुन्या आठवणींना दिला उजाळा सावंतवाडी : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शारदा विद्यालय मळगाव शाळेतील इयत्ता चौथीच्या वर्गाचा निरोप समारंभ शाळेतील शिक्षकांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी शारदा विद्यालयाच्या मुख्याध्यापिका अनुराधा सुर्वे, शिक्षिका सीमा सावंत, शिक्षिका अस्मिता गोवेकर व विद्यार्थी उपस्थित होते. शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी…

Read More

गणेश मित्र मंडळ आणि विशाल परब पुरस्कृत शूटिंग बॉल स्पर्धेचे विशाल परब यांच्या हस्ते उद्घाटन…

कुडाळ ता.०४-:* गणेश मित्र मंडळ कुडाळ आयोजित आणि हिंदू मराठा संघाचे अध्यक्ष विशाल परब पुरस्कृत सिंधुदुर्ग जिल्हा भव्य खुल्या भव्य शूटिंग बॉल स्पर्धेचे उद्घाटन उद्योजक तथा हिंद मराठा संघाचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष विशाल परब यांच्या हस्ते झाले.कुडाळ येथील मराठा हॉलच्या बाजूला असलेल्या मराठा समाजाच्या मैदानात हे उद्घाटन मोठ्या दिमाखात झाले. यावेळी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी व उद्घाटक म्हणून…

Read More

जनतेच्या पैशापेक्षा खिशातून पर्यटन महोत्सव साजरा करा

माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर आ वैभव नाईक, महेश कांदळगांवकर यांच्यावर केली टीका मालवण ता.०४-:* मालवण नगरपालिकेत गेल्या पाच वर्षात माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर आणि आमदार वैभव नाईक यांनी मालवण शहरात विकास कामांचे तीन तेरा वाजवले. आमदार वैभव नाईक गेल्या आठ वर्षात आमदारकीच्या काळात स्व:खर्चातून महोत्सव सोडा साधा सांस्कृतिक कार्यक्रम घेऊ शकले नाहीत. मात्र आता नगरपरिषद…

Read More

पोईप येथे ७ रोजी विविध कार्यक्रम

मालवण ता.०४-:* पोईप येथील तरुण मित्रमंडळातर्फे ७ मे रोजी पोईप विरण बाजारपेठ येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी ३ वा. सत्यनारायण महापूजा, आरती, तिर्थप्रसाद, नंतर स्थानिकांची भजने, रात्री ९ वा. चेंदवणकर दशावतार नाट्य मंडळ (कवठी) यांचा ‘सौभाग्य नाही, तर रेडा नाही’ हा नाट्यप्रयोग होणार आहे.

Read More

वायरी भूतनाथ येथे शिवजयंती उत्सव साजरा

मालवण ता.०४-:* वायरी भूतनाथ येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात पारंपरिक शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करून सुभाष पाटकर यांच्या हस्ते त्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी – विवेक वेंगुर्लेकर, प्रदीप वेंगुर्लेकर, चिंतामणी मयेकर, काना माडये, विक्रांत मातोंडकर, परशुराम मयेकर, संतोष मयेकर, शेखर भगत, सागर हिर्लेकर, विजय तारी, तन्मय माणगावकर,…

Read More
You cannot copy content of this page