कोसेसाव फर्नांडीस यांचा सेवानिवृत्तीपर सत्कार

वेंगुर्ले ता.०५-:* वेंगुर्ला येथील मदर तेरेसा स्कूलमध्ये लहान मुलांच्या सेवेसाठी ‘आया‘ या पदावर कार्यरत असलेल्या कोसेसाव मार्यान फर्नांडिस यांचा सेवानिवृत्तपर सत्कार कार्यक्रम १ मे रोजी पार पडला.

यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि द सिधुदुर्ग डायोसिसन एज्युकेशनल ट्रस्टचे सचिव फादर अॅड.मॅन्यूएल डिसिल्व्हा, सिधुदुर्ग धर्मप्रांताचे विकर जनरल प्रशालेचे व्यवस्थापक आणि इमॅक्युलेट कन्सेप्शन चर्चचे प्रमुख धर्मगुरु फादर अॅण्ड्रयू डिमेलो, मुख्याध्यापक फादर अॅन्थोनी डिसोजा आणि उपमुख्याध्यापक फादर कॅजिटन रॉड्रिग्ज उपस्थित होते. कोसेसाव फर्नांडिस यांचा अॅड.मॅन्यूएल डिसिल्वा यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करीत १७ वर्षे केलेल्या कार्याचा गौरव केला. ग्लॅनिस पिटो यांनी त्यांच्याविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या. तर मृण्मयी परब यांनी सन्मानपत्राचे वाचन केले.

फादर अॅण्ड्रयू डिमेलो यांच्या हस्ते कोसेसाव फर्नांडिस यांना सन्मानपत्र बहाल करण्यात आले. तसेच त्यांच्या भावी आयुष्याची तजविज करण्यासाठी दीड लाख रुपयांचा धनादेश मनुजा अंधारी व दहावीची विद्यार्थीनी रेवा तोरघ्स्कर यांच्या हस्ते देण्यात आले. आंजेलिन फर्नांडीस कोसेसाव फर्नांडीस यांना मिळालेल्या निधीचे वाचन केले. मुख्याध्यापक फादर अॅन्थोनी डिसोजा यांनी फर्नांडीस यांच्या कार्याचे कौतुक केले. लविना आल्मेडा यांनी सर्व विद्यार्थी, शिक्षक, पालक व मुख्याध्याप यांचे आभार मानले. सूत्रसंचालन रेचल डिसोजा यांनी तर शिल्पा चव्हाण यांनी आभार मानले.

You cannot copy content of this page