Headlines

कुंभारमाठ येथील जरीमरी देवी मंदिरात नवरात्रौत्सवाचे आयोजन

मालवण (प्रतिनिधी)

मालवण कुंभारमाठ येथील श्री जरीमरी देवी मंदिरात नवरात्रौत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त दि. ११ ते १९ ऑक्टोबर या कालावधीत विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

यानिमित्त नवरात्रौत्सव कालावधीत रोज सकाळी ९ वा. देवीचा अभिषेक, दुपारी १२. ३० वा. देवीची आरती, दुपारी १ ते ३ वा. महाप्रसाद, सायंकाळी ७ वा. देवीची आरती असे कार्यक्रम होणार आहेत.

तसेच यानिमित्त रोज रात्री ८ वा. भजन, डबलबारी व सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. यामध्ये रविवार दि. ११ ऑक्टोबर रोजी श्री कुलस्वामिनी प्रासादिक भजन मंडळ, खालची देवली बुवा – श्री. मधुसूदन चव्हाण, १२ ऑक्टोंबर रोजी सायं. ६ वा. श्री आदर्श संगीत विद्यालय बुवा-बंटी वराडकर, रात्री ८ वा. शंकर मंदिर मेढा महिला मंडळ प्रस्तुत रंगमेळा कार्यक्रम, १३ रोजी श्री घुमडे भजन मंडळ घुमडे, बुवा – श्री. नाना सामंत, दि. १४ रोजी श्री आकारी ब्राम्हणदेव प्रासादिक भजन मंडळ, कातवड, बुवा – श्री. चेतन धुरी, दि. १५ रोजी श्री देवकी माता प्रासादिक भजन मंडळ न्हीवे, बुवा – श्री. सिद्धेश पाताडे, दि. १६ रोजी श्री ब्राम्हणदेव प्रासादिक भजन मंडळ, कांदळगाव कातवड, बुवा – श्री. मंगेश नलावडे, दि. १७ रोजी डबलबारी- बुवा – सौ. स्वराली नाटेकर बुवा – सौ. योगिता नंदू पवार, दि. १८ रोजी सायं. ६ वा. लालित्य साळगावकर यांचा सुरसंगम कार्यक्रम, रात्री ८ वा. श्री ब्राह्मण देव भजन मंडळ, काळेधर पिरखोली बुवा – श्री. सुदेश पारकर, दि. १९ रोजी श्री वावडी देवी प्रसादिक भजन मंडळ आनंदव्हाळ बुवा – श्री. शरद सावंत, दि. २० रोजी श्री भवानी प्रासादिक भजन मंडळ वस्त वाडी बुवा – श्री. चंदू वस्त यांचे भजन होणार आहे. तरी सर्व भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक गावकर व समस्त ग्रामस्थ यांनी केले आहे.

You cannot copy content of this page