Headlines

सावंतवाडी शहरात बिबट्याची एन्ट्री…?

सावंतवाडी : शहरात खासकीलवाडा परिसरात भरवस्तीत बिबट्या दाखल झाल्याची घटना आज रात्रीच्या सुमारास घडली. काहीजणांनी त्याला प्रत्यक्ष पाहिले.

आज रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. शहरात बिबट्या असून आज रात्री खासकीलवाडा भागात तो दिसून आला. राजवाड्याच्या मागील बाजूस असलेल्या झाडीतून त्याने पलायन केल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. दरम्यान, घटनास्थळी वनविभागाची टीम दाखल झाली असून बिबट्याचा शोध घेत आहे. मात्र, या घटनेमुळे परिसरात भितीच वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाचे वनरक्षक कोलगाव अक्षय कुंभार, माजगावचे सुनील चोथे, मळगावचे सुनिल गडदे, आरारटी शुभम फाटक, तुषार सावंत आदींसह वनविभागाची टीम उपस्थित होती.

You cannot copy content of this page