Headlines

गावडेवाडीसाठी स्मशान शेड मंजूर

विक्रांत सावंत यांच्या जनसुविधा योजनेतून मंजूर: गुणाजी गावडे यांच्या पाठपुराव्याला यश..

सावंतवाडी : गावडेवाडी येथील ग्रामस्थांच्या मागणीची दखल घेत जिल्हा परिषद सदस्य मा. विक्रांत सावंत यांच्या जनसुविधा योजनेतून गावडेवाडी येथे स्मशान शेड मंजूर करण्यात आले आहे. सरपंच गुणाजी गावडे यांनी या कामासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता.
गावातील नागरिकांच्या दृष्टीने अत्यावश्यक असलेल्या या सुविधेमुळे अंत्यविधीच्या वेळी ग्रामस्थांची होणारी गैरसोय दूर होणार आहे. स्मशान शेड मंजूर झाल्याबद्दल ग्रामस्थांनी जिल्हा परिषद सदस्य विक्रांत सावंत, संबंधित अधिकारी व पदाधिकारी तसेच सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार मानले आहेत.

You cannot copy content of this page