Headlines

“सिंधुदुर्गच्या राजा” समोर रंगली अस्सल मालवणी फुगडी”…

कालवीबंदरच्या श्री विठ्ठल रखुमाई फुगडी गृपच्या महिलांनी फुगडीचे अप्रतिम केले सादरीकरण..

⚡सिंधुदुर्ग दि.०७-: केळूस-कालवीबंदर येथील कु.दिव्या खवणेकर हिच्या संकल्पनेतून साकारलेल्या श्री विठ्ठल रखुमाई महिला गृप फुगडीतील महिलांनी कुडाळ येथील “सिंधुदुर्ग राजा”च्या दरबारात फुगडीचे अप्रतिम सादरीकरण केले.

कोकणातील फुगडीची परंपरा शेकडो वर्षे सुरू असून, जिल्हाभरातून आलेल्या विविध महिलांनी सिंधुदुर्ग राजाच्या दरबारात फुगडयांचे दरवर्षी प्रमाणे यंदाही सादरीकरण केले.

केळूस-कालवीबंदर येथील श्री विठ्ठल रखुमाई फुगडी गृपच्या महिलांनी यंदा पहिल्यांदाच सिंधुदुर्ग राजाच्या दरबारात मराठी आणि मालवणी भाषेतून ही फुगडी सादर केल्याने उपस्थित नागरिकांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला. 

“सिंधुदुर्गचा राजा” समोर अस्सल मालवणी संस्कृतीमधील फुगडी नृत्य सादर केल्यानंतर सिंधुदुर्ग राजाच्या समोर कालवीबंदर येथील श्री.विठ्ठल रखुमाई फुगडी गृपच्या कु.दिव्या खवणेकर हिला सिंधुदुर्ग राजा प्रतिष्ठानचे सदस्य विनायक राणे यांनी श्रीफळ देऊन सन्मानित केले.यावेळी फुगडी गृपच्या कु.मंजुश्री कुबल, कु.जानवी पाटील,कु.लावण्या राऊळ, कु.वैदेही बोवलेकर, कु.जान्हवी म्हाडदकर यांच्यासह फुगडीतील महिला उपस्थित होत्या. यावेळी प्रतिष्ठानचे सदस्य राकेश नेमळेकर, पत्रकार आबा खवणेकर, संदेश सुकळवाडकर, रोहित आटक,पुजारी विनायक घाडी यांच्यासह आदि प्रतिष्ठानचे सदस्य उपस्थित होते.

सिंधुदुर्ग राजाच्या दरबारात आम्हाला फुगडी सादर करण्याची संधी दिल्याबद्दल कु.दिव्य खवणेकर हिने सिंधुदुर्ग राजा प्रतिष्ठानच्या सर्व सदस्यांचे आभार मानले.

You cannot copy content of this page