वेंगुर्ला ता.०५-:* वेंगुर्ला येथील ग्रामदेवी श्री सातेरीचा वार्षिक वर्धापनदिन सोहळा ७ व ८ मे रोजी संपन्न होत आहे.
यानिमित्त दि.७ रोजी धार्मिक विधी, सकाळी ९ व. कुंकूमार्चन, सायं.७ वा. सद्गुरुनाथ मंडळ तुळस यांचे भजन, रात्रौ ८ वा. केपादेवी वारकरी मंडळ उभादांडा यांचे भजन, दि.८ रोजी सकाळी ९ वा. श्रीसत्यनारायण महापूजा, दु. १२ वा. महाआरती, तिर्थप्रसाद, महानैवेद्य व भाविकांना महाप्रसाद, सायं.७ वा. देऊळवाडा मंडळ वेंगुर्ला यांचे भजन, रात्रौ १० वा. पार्सेकर दशावतार मंडळाचे नाटक होणार आहे. तरी भाविकांनी दर्शनाचा, महाप्रसादाचा व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन सातेरी देवस्थान विश्वस्त मंडळातर्फे केले आहे.
