सिंधुरत्न टॅलेंट सर्च परीक्षेत भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळेतील विद्यार्थ्यांचे नेत्रदीपक यश….

सावंतवाडी ता 5 : युवा संदेश प्रतिष्ठान नाटळ सांगवे आयोजित सिंधुरत्न टॅलेंट सर्च जिल्हास्तरीय स्पर्धा परीक्षेत भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळा चराठे नं 1 च्या विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक यश संपादन केले आहे.

या शाळेतील तिसरी तील तीन विद्यार्थी जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीत चमकले असून तिसरीतील एक विद्यार्थिनी तालुका गुणवत्ता यादीत आली आहे तसेच इतर सात विद्यार्थ्यांना वेगवेगळी मेडल प्राप्त झाली आहे या स्पर्धा परीक्षेत सृष्टी गावडे 158गुण जिल्ह्यात 9 वी, आयुष परब 150 गुण जिल्ह्यात 17 वा, अदिती रावराणे 148 गुण जिल्ह्यात 20 वी यांनी यश प्राप्त करत सिल्वर मेडल प्राप्त केली आहेत तर तिसरीतील सिया नाईक 158 गुण सह सावंतवाडी तालुक्यात द्वितीय, आस्था लिंगवत 146 गुण मिळवत यांनी सिल्वर मेडल पटकावले. आराध्या देसकर 124 गुण 3 री, दुर्वा वेजरे 132 गुण, श्रावणी सोमवंशी 122 गुण चौथी, यांना ब्राँझ मेडल तर इयत्ता सहावीतील शुभंकर कुबल 142 गुण वेदांत दराडे 128 गुण ऋतुजा राऊळ 122 गुण यांनी ब्राँझ मेडल पटकावले या विद्यार्थ्यांना शाळेतील सर्व शिक्षक मुख्याध्यापक यांचे मार्गदर्शन लाभले विद्यार्थ्यांचा या यशाबद्दल शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष समीर नाईक केंद्रप्रमुख नरेंद्र सावंत गटशिक्षणाधिकारी कल्पना बोडके यांनी अभिनंदन केले

You cannot copy content of this page