Headlines

परबवाडा शाळेचा वार्षिक पारितोषिक वितरण संपन्न

*⚡वेंगुर्ला ता.०६-:* वेंगुर्ला शाळा परबवाडा नं.१चा मागील दोन वर्षांचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ कोविडमुळे घेता आला नव्हता. त्यामुळे दोन वर्षांचा एकत्रित कार्यक्रम शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संदिप परब यांच्या अध्यक्षतेखाली आणि सरपंच विष्णू परब, उपसरपंच हेमंत गावडे, पालक व ग्रामस्थ यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आला. यावेळी शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी, एस.टी.एस, ब्रेनडेव्हलपमेंट, गणित संबोध यांसारख्या शाळाबाह्य स्पर्धा…

Read More

सावंतवाडीतील युवकांचा गोवा येथे समुद्रात बुडून मृत्यू…

सावंतवाडी ता.०६-:* गोवा येथे शिक्षण घेत असलेल्या सावंतवाडीतील युवकांचा गोवा कांदोळी येथील समुद्रात बुडून मृत्यू झाला आहे. लौकिक विलास सातार्डेकर असे त्या युवकाचे नाव आहे. ही घटना काल गुरुवारी घडली असून, आज दुपारी त्याचा मृतदेह सावंतवाडी येथील निवासस्थानी आणण्यात येणार आहे.

Read More

आंबोली घाटातील अवजड वाहतूक तात्काळ बंद करा…

राष्ट्रवादीची बांधकाम कार्यकारी अभियंता यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी सावंतवाडी ता.०६-:* आंबोली घाटातून सुरू असणारी अवजड वाहतूक तात्काळ बंद करण्यात यावी अशी मागणी सावंतवाडी तालुका राष्ट्रवादी कडून बांधकाम कार्यकारी अभियंता अनामिका चव्हाण यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. याबाबत त्यांनी निवेदन दिले असून, त्यात असे नमूद करण्यात आले की, पावसाळा जवळ आला असून घाटात मोठ्या प्रमाणात अवजड वाहतूक…

Read More

पुढाऱ्यांच्या दबावापोटी मायनिंग वाहतूक डंपरवर कारवाई नको

कॉंग्रेस तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर : कारवाई केल्यास अधिकाऱ्यांना सावंतवाडीत फिरू देणार नसल्याचा इशारा सावंतवाडी ता.०६-:* कोरोनाकाळात २ वर्ष डंपर व्यवसाय ठप्प होता. या दरम्यान बँकांचे हप्ते व्यवसायिक भरत होते. त्यात नुकताच मायनिंग व्यवसाय सुरू झाला असून भविष्यात पावसाळा आहे. काही राजकीय नेत्यांच्या स्वार्थासाठी अधिकाऱ्यांकडून दबाव आणत डंपरांवर कारवाई केली जात आहे. या संदर्भात परिवहन विभागाच…

Read More

पाडलोस केणीवाडा येथे श्रमदानातून खड्डे बुजविले

बांदा ता.०६-:* बांदा शिरोडा मार्गावरील पाडलोस येथे धोकादायक अपघाती खड्डे पडले असून सार्वजनिक बांधकाम विभागाचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. मात्र केणीवाडा येथील काही तरुणांनी एकत्र येत अपघाती खड्डे बुजवल्याने परिसरात समाधान व्यक्त होत आहे. सोमवारी सकाळी केणीवाडा ठिकाणी खड्ड्यात गाडी गेल्याने दुचाकीस्वाराचा अपघात झाला होता. दुखापत गंभीर झाली नाही परंतु ग्रामस्थांनी याची दखल मात्र घेतली….

Read More

मळेवाड येथील रक्तदान शिबिराला उस्फूर्त प्रतिसाद

हातभार चॅरिटेबल ट्रस्ट सिंधुदुर्ग व श्री कुलदेवता युवक कला क्रीडा मंडळ, मळेवाड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन सावंतवाडी ता.०६-:* श्री कुलदेवता विद्या मंदिर शाळा नं २ मंदिर ,वरची मळेवाड- येथे लाईफ टाईम हॉस्पिटल यांचं आरोग्य तपासणी शिबिर नामांकित डॉक्टर यांच्या टीमच्या उपस्थितीत पार पडले. या शिबिरात विविध प्रकारची आरोग्य सेवा देण्यात आली. यात ,नेत्र तपासणी,हृदय तपासणी,कर्क…

Read More

तहसीलदार कार्यालय समोर सापडला भला मोठा अजगर…

सर्पमित्र नवीद हेरेकर यांनी पकडुन केले वनविभागाच्या स्वाधीन … *सावंतवाडी ता.०५-:* येथील तहसीलदार कार्यालयाच्या प्रवेशद्वारा समोर भला मोठा अजगर आढळून आला आहे. त्याला सर्पमित्र नवीद हेरेकर यांनी पकडून वनविभागाच्या स्वाधीन केले आहे. ही घटना आज रात्री पावणे नऊच्या सुमारास घडली असून, यावेळी घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

Read More

पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्यामुळेच “त्या” स्टॉल धारकांना स्टॉल हटविण्याच्या नोटिसा…

माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांचा आरोप… मालवण दि प्रतिनिधी मालवण बंदर जेटी येथे गेली कित्येक वर्ष स्थानिक लोक हंगामी स्वरूपात स्टॉल उभारून छोटा मोठा व्यवसाय करत आहेत. मात्र, या व्यावसायिकांना बंदर विभागाने स्टॉल हटावच्या ज्या नोटिसा बजावल्या आहेत त्याला पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडी सरकार जबाबदार असल्याचा आरोप मालवणचे माजी नगराध्यक्ष श्री. सुदेश…

Read More

लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची १०० वी पुण्यतिथी कृतज्ञता पर्व म्हणून करणार साजरा…

१०० सेकंद स्तब्ध उभे राहून व्हावी आदरांजली; मालवण, दि प्रतिनिधी लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची ६ मे रोजी सकाळी १०० पुण्यतिथी आहे. या पार्श्वभूमीवर हे वर्ष कृतज्ञता पर्व म्हणून साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त सकाळी १० वाजता १०० सेकंद स्तब्धता पाळून लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांना आदरांजली अर्पण करण्यात येणार आहे. तरी शहरवासीयांनी आपण…

Read More

मालवण बंदर जेटी वरील स्टॉल हटाव कारवाई प्रशासनाने तात्काळ थांबवावी…

राष्ट्रवादी काँग्रेस शहर अध्यक्ष सतीश आचरेकर यांची आक्रमक भूमिका… मालवण दि प्रतिनिधी मालवण बंदर जेटी परिसरात हंगामी स्वरूपात स्टॉल उभारून गेली अनेक वर्षे पर्यटन पूरक व्यवसाय करणाऱ्या व्यवसायिकांना नोटिसा बजावत सुरू करण्यात आलेली ‘स्टॉल हटाव’ कारवाई प्रशासनाने तात्काळ थांबवावी. सुरू असलेल्या या पर्यटन हंगामात कोणत्याही पर्यटन व्यवसायिकांवर कारवाई होता नये. अशी आक्रमक भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे…

Read More
You cannot copy content of this page