पुढाऱ्यांच्या दबावापोटी मायनिंग वाहतूक डंपरवर कारवाई नको

कॉंग्रेस तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर : कारवाई केल्यास अधिकाऱ्यांना सावंतवाडीत फिरू देणार नसल्याचा इशारा

सावंतवाडी ता.०६-:* कोरोनाकाळात २ वर्ष डंपर व्यवसाय ठप्प होता. या दरम्यान बँकांचे हप्ते व्यवसायिक भरत होते. त्यात नुकताच मायनिंग व्यवसाय सुरू झाला असून भविष्यात पावसाळा आहे. काही राजकीय नेत्यांच्या स्वार्थासाठी अधिकाऱ्यांकडून दबाव आणत डंपरांवर कारवाई केली जात आहे. या संदर्भात परिवहन विभागाच लक्ष वेधणार असून परिवहन राज्यमंत्री बंटी पाटील यांचही लक्ष वेधणार आहे. तर राजकीय पुढाऱ्यांच्या दबावाखाली कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांना सावंतवाडीत फिरू देणार नाही असा इशारा कॉंग्रेस तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांनी दिला आहे.

You cannot copy content of this page