⚡सावंतवाडी, ता.०६-: भाजप किसान मोर्चाच्या सिंधुदुर्ग जिल्हा उपाध्यक्षपदी अजय सावंत यांची, तर किसान मोर्चाच्या सावंतवाडी शहर अध्यक्षपदी अमित गवंडळकर यांची निवड झाली आहे. या निवडीबद्दल भाजपचे युवा नेते महाराष्ट्र विशाल परब यांनी दोन्ही नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.

यावेळी विशाल परब यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. किसान मोर्चाच्या माध्यमातून शेतकरी बांधवांच्या प्रश्नांना प्राधान्य देत पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी कार्य करावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
