बांदा ता.०६-:* बांदा शिरोडा मार्गावरील पाडलोस येथे धोकादायक अपघाती खड्डे पडले असून सार्वजनिक बांधकाम विभागाचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. मात्र केणीवाडा येथील काही तरुणांनी एकत्र येत अपघाती खड्डे बुजवल्याने परिसरात समाधान व्यक्त होत आहे.
सोमवारी सकाळी केणीवाडा ठिकाणी खड्ड्यात गाडी गेल्याने दुचाकीस्वाराचा अपघात झाला होता. दुखापत गंभीर झाली नाही परंतु ग्रामस्थांनी याची दखल मात्र घेतली. पाडलोस माजी तंटामुक्त समिती अध्यक्ष महेश कुबल, सामाजिक कार्यकर्ते श्रीधर परब, ग्रामस्थ विष्णु नाईक, प्रशांत नाईक, गुरुनाथ पटेकर, भास्कर नाईक आदी ग्रामस्थांनी एकत्र येत तो अपघाती खड्डा मातीच्या साहाय्याने बुजविला. महेश कुबल म्हणाले की, आम्ही तात्पुरता खड्डा बुजविला परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाने याची दखल घेत खडीकरण व डांबरीकरण करणे आवश्यक आहे. भविष्यात खड्ड्यामुळे अपघात झाल्यास जबाबदार कोण असा सवालही श्री. कुबल यांनी बांधकाम विभागास केला.
