मळेवाड येथील रक्तदान शिबिराला उस्फूर्त प्रतिसाद

हातभार चॅरिटेबल ट्रस्ट सिंधुदुर्ग व श्री कुलदेवता युवक कला क्रीडा मंडळ, मळेवाड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन

सावंतवाडी ता.०६-:* श्री कुलदेवता विद्या मंदिर शाळा नं २ मंदिर ,वरची मळेवाड- येथे लाईफ टाईम हॉस्पिटल यांचं आरोग्य तपासणी शिबिर नामांकित डॉक्टर यांच्या टीमच्या उपस्थितीत पार पडले. या शिबिरात विविध प्रकारची आरोग्य सेवा देण्यात आली.

यात ,नेत्र तपासणी,हृदय तपासणी,कर्क रोग तपासणी,स्त्री रोग तपासणी,गुडघेदुखी,कंबर मणके दुखी तपासणी,मूळव्याध,मुतखडा, हर्निया व इतर आजार,कान, नाक,घसा तपासणी केली गेली . तसेच या दिवशी दुपारी २:०० वा श्री सत्यनारायण महापूजा व यानिमित्त रात्रौ ठीक ९: ००वा.रेंबो फ्रेंड सर्कल कवठणी निर्मित २ अंकी तुफान विनोदी मालवणी नाटक, *शबय* चे आयोजन केले होते.

या कार्यक्रमांत श्री कुलदेवता युवक कला क्रीडा मंडळाच्या वतीने गावातील माजीसैनिक,तसेच इतर क्षेत्रातील व्यक्तींचा शाल श्रीफळ, गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला. याप्रसंगी जि्.प.सदस्य राजन मुळीक यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करुन, श्रीफळ वाढवून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.

यावेळी व्यासपीठावर राजन मुळीक, बाळ शिरसाट,विकास नाईक, ग्रा.पं.सदस्या सानिका शेवडे,प्रकाश पार्सेकर,सदानंद चव्हाण,सुभाष मुळीक,संतोष मुळीक,महेश्वर कुंभार, बाबल नाईक, विद्याधर पाटणकर,श्री कवठणकर,मनोज सातार्डेकर,तसेच श्री कुलदेवता युवक कला क्रीडा मंडळ चे सर्व कार्यकर्ते,ग्रामस्थ उपस्थित होते.यावेळी मंडळाच्या वतीने हातभार चॅरिटेबल ट्रस्ट,सिंधुदुर्ग चे विशेष आभार मानण्यात आले.कार्यक्रमाची प्रस्तावना सौ.अस्मी अमित नाईक तर सूत्रसंचलन ,आभार प्रदर्शन सगुण नाईक यांनी मानले.कार्यक्रमात खास करून, कै.संतोष गणपत मुळीक, कै.मनोज सदानंद नाईक, कै.गंगाराम दत्ताराम मुळीक, नंदकिशोर लवू नाईक,यांचे स्मरण करण्यातआले.यावेळी कार्यक्रमाला प्रेक्षकांची ,ग्रामस्थांची उपस्थिती लक्षणीय होती.

You cannot copy content of this page