Headlines

सालाईवाड्यात पिण्याच्या पाण्याला ड्रेनेजचा वास..

काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसह नागरिकांची नगरपालिकेकडे धाव:तर संबंधितांवर त्वरित कारवाई करू; नगराध्यक्षांचे आश्वासन..

सावंतवाडी, ता. ६ : सावंतवाडी शहरातील सालाईवाडा येथील डॉ. खानोलकर परिसरात पिण्याच्या पाण्याला ड्रेनेजचा वास येत असल्याची तक्रार स्थानिक नागरिकांनी केली आहे. या प्रकारामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करत सावंतवाडी तालुका काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसह नागरिकांनी आज सावंतवाडी नगरपालिकेच्या नगराध्यक्ष श्रद्धाराजे भोसले व मुख्याधिकारी यांची भेट घेऊन समस्या निदर्शनास आणून दिली.

पिण्याच्या पाण्यात दुर्गंधी येत असल्याने नागरिकांमध्ये चिंता निर्माण झाली असून, या समस्येची तातडीने पाहणी करून आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. नागरिकांच्या तक्रारीची दखल घेत नगराध्यक्ष व मुख्याधिकाऱ्यांनी संबंधित परिसराची तात्काळ पाहणी करून आवश्यक कार्यवाही करण्याचे आदेश दिले.
यावेळी सावंतवाडी तालुका काँग्रेस अध्यक्ष अभय मालवणकर यांच्यासह स्थानिक नागरिक आनंद आयरे, कौस्तुभ पेडणेकर, आफताब हेरेकर, बाळा नमशी, विनायक ओठवणेकर, पीटर फर्नांडिस, इनास मारतीस आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page