Headlines

रस्ते दुरुस्तीच्या कामांचा नगराध्यक्षांकडून प्रत्यक्ष आढावा…

कामांचा दर्जा राखून निर्धारित वेळेत पूर्ण करण्याचे कंत्राटदारांना निर्देश..

⚡सावंतवाडी ता.२३-: शहरातील मोरडोंगरी, लक्ष्मीनगर आणि तहसीलदार रोड परिसरात वॉटर पाइपलाइन तसेच गॅस पाइपलाइन टाकण्याच्या कामानंतर सुरू असलेल्या रस्ते दुरुस्तीच्या कामांची नगराध्यक्षा श्रद्धाराजे सावंत-भोसले यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी केली.

पाइपलाइन टाकण्यासाठी खोदण्यात आलेल्या रस्त्यांची दुरुस्ती योग्य पद्धतीने आणि दर्जेदार होणे आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. रस्ते दुरुस्तीच्या कामात कोणत्याही प्रकारची हलगर्जीपणा होऊ नये. तसेच या कामांमुळे नागरिकांना वाहतुकीचा त्रास सहन करावा लागू नये आणि पावसाळ्यात चिखलाचा सामना करावा लागू नये, याची दक्षता घेण्याच्या सूचना त्यांनी संबंधित कंत्राटदार व अधिकाऱ्यांना दिल्या.

रस्ते दुरुस्तीची कामे गुणवत्तापूर्ण पद्धतीने आणि निर्धारित वेळेत पूर्ण करण्याचे कडक निर्देशही नगराध्यक्षांनी यावेळी दिले.
या पाहणी दौऱ्यावेळी महिला व बालकल्याण सभापती दिपाली भालेकर, नगरसेविका नीलम नाईक, बांधकाम अधिकारी तुषार सरडे, मनोज राऊळ यांच्यासह नगरपरिषदेचे कर्मचारी उपस्थित होते.

You cannot copy content of this page