⚡मालवण ता.२२-:
मालवण तालुक्यातील चौके येथील व्यावसायिक हेमंत उर्फ भाई चव्हाण यांच्या पत्नीचे अल्पशा आजाराने निधन झाल्याने चव्हाण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या दुःखद प्रसंगी कुडाळ-मालवणचे माजी आमदार तथा ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांनी चव्हाण यांच्या निवासस्थानी भेट देऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले.

यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख विनोद सांडव, युवासेना तालुकाप्रमुख मंदार गावडे, पेंडुर विभागप्रमुख वंदेश ढोलम, गणेश मोरजकर, रावसाहेब मदने आणि नामदेव चौकेकर उपस्थित होते.
