राष्ट्रवादीची बांधकाम कार्यकारी अभियंता यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी
सावंतवाडी ता.०६-:* आंबोली घाटातून सुरू असणारी अवजड वाहतूक तात्काळ बंद करण्यात यावी अशी मागणी सावंतवाडी तालुका राष्ट्रवादी कडून बांधकाम कार्यकारी अभियंता अनामिका चव्हाण यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
याबाबत त्यांनी निवेदन दिले असून, त्यात असे नमूद करण्यात आले की, पावसाळा जवळ आला असून घाटात मोठ्या प्रमाणात अवजड वाहतूक सुरू असून पावसाळ्याच्या तोंडावर घाट खचण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे यावर तात्काळ निर्णय घेऊन ही वाहतूक बंद करण्यात यावी. अशी मागणी राष्ट्रवादीकडून करण्यात आली आहे. याबाबत राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी बांधकाम कार्यकारी अभियंता यांची भेट घेऊन या संदर्भात चर्चा करून निवेदन दिले.
यावेळी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, शहर अध्यक्ष देवेंद्र टेमकर, जिल्हा कार्याध्यक्ष उद्योग व्यापार विभाग हिदायतुल्ला खान, तालुका उपाध्यक्ष संतोष जोईल, अल्पसंख्यांक जिल्हा उपाध्यक्ष इफ्तिकार राजगुरू, जिल्हा उपाध्यक्ष आसिफ शेख, तालुका उपाध्यक्ष बवतीस, जिल्हा उपाध्यक्ष उद्योग व्यापर आशिष कदम, फर्नांडिस राकेश नेवागी, मयुरेश मुळीक, याकुब शेख, सूर्यकांत नाईक, नियाझ शेख, आदी उपस्थित होते.
