Headlines

बाहेरचा वाडा-कुणकेरी रस्त्यावर एमएसईबी कर्मचाऱ्याच्या चालत्या गाडीला आग..

स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेने अनर्थ टळला; नगरपालिका अग्निशमन बंबाच्या मदतीने आग आटोक्यात..

⚡सावंतवाडी ता.१०-: बाहेरचा वाडा-कुणकेरी रस्त्यावर एमएसईबी कर्मचारी साळवी यांच्या चालत्या वाहनाने अचानक पेट घेतल्याची घटना सोमवारी घडली. वाहनाला आग लागल्याचे लक्षात येताच परिसरातील स्थानिक नागरिकांनी तत्काळ धाव घेत आग विझविण्यासाठी प्रयत्न केले.

स्थानिक नागरिकांनी केलेल्या प्रयत्नांमुळे आग नियंत्रणात आणण्यात आली. त्यानंतर सावंतवाडी नगरपालिकेचा अग्निशमन बंब घटनास्थळी पाचारण करण्यात आला. अग्निशमन दलाने पाण्याचा मारा करून वाहनाची आग पूर्णपणे विझवली.
यावेळी स्थानिक नागरिक जहूर शेख, शेखर सुभेदार, दिलीप भालेकर, श्री. पटेल तसेच महिला व बालकल्याण सभापती दिपाली भालेकर आणि अन्य ग्रामस्थ उपस्थित होते. नागरिकांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला.

You cannot copy content of this page