Headlines

खैदा विठ्ठल रखुमाई मंदिराचा उद्या वर्धापन दिन सोहळा

मालवण ता.०९-:* मालवण तालुक्यातील खैदा येथील श्री विठ्ठल रखुमाई मंदिराचा आठवा वर्धापन दिन सोहळा मंगळवार दि. १० मे रोजी साजरा होणार आहे. यानिमित्त सकाळी ९ वा. श्री विठ्ठल रखुमाईला अभिषेक, सकाळी ११ वा. सत्यनारायण महापूजा, दुपारी १ वा. दिंडी प्रदक्षिणा, १.३० वा. महाप्रसाद, सायंकाळी ५ वा. स्थानिक भजने, सायंकाळी ६.३० वा. महिला वारकरी भजन तर…

Read More

भोंगलेवाडी रस्त्याचे काम १० मे पूर्वी पूर्ण न केल्यास रास्ता रोको आंदोलन…

मसुरे युवासेना विभागप्रमुख राहुल सावंत यांचा इशारा मालवण (प्रतिनिधी) गेली तीन वर्षे रेंगाळत सुरू असलेले बिळवस भोगलेवाडी रस्त्याचे काम ठेकेदाराने १० मे पुर्वी पूर्ण न केल्यास रास्ता रोको करून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा मसुरे युवासेना विभागप्रमुख राहुल सावंत यांनी दिल्यानंतर युवसेनेच्या या दणक्यामुळे अखेर संबंधित ठेकेदाराने या रस्त्याचे काम सुरू केले आहे. कुडाळ मालवणचे आमदार…

Read More

दोन वर्षांपूर्वी नीलेश राणेंनी देवबाग बंधाऱ्यांची केलेली पाहणी कार्यकर्त्यांच्या टक्केवारीसाठी होती का..?

हरी खोबरेकर; तळाशीलवासीयांपाठोपाठ देवबाग वासीयांची दिशाभूल नको… मालवण ता.०९-:* देवबाग गावच्या संरक्षणासाठी आवश्यक बंधार्‍यासाठी सत्ताधार्‍यांकडून गेल्या काही वर्षात एकही दगड पडला नाही असे सांगणारे माजी खासदार नीलेश राणे यांनी दोन वर्षापूर्वी देवबाग गावात बंधार्‍याच्या सुरू असलेल्या कामाची आपल्या कार्यकर्त्यांना टक्केवारी मिळवून देण्यासाठी पाहणी केली होती का? असा प्रश्‍न शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी उपस्थित केला…

Read More

श्री देवी घुमडाईचा ११ वा वर्धापनदिन सोहळा उत्साहात साजरा…

मालवण दि प्रतिनिधी मालवण तालुक्यात डोंगर कुशीत वसलेल्या निसर्गसंपन्न घुमडे गावातील श्री देवी घुमडाई मंदिर मूर्तीप्राणप्रतिष्ठापना व जीर्णोद्धार दिनाचा ११ वा वर्धापनदिन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या सोहळ्यास रविवारी भाजप प्रदेश सचिव माजी खासदार निलेश राणे यांनी उपस्थित राहून देवीचे दर्शन घेतले. ‘निलेश राणे मालवण कुडाळ मतदारसंघातुन मोठ्या मताधिक्याने आमदार होऊदे’ असे गाऱ्हाणे उपस्थित…

Read More

जिल्हा परिषदेचे संभाव्य कृषी, पशु-पक्षी प्रदर्शन चुकीच्या वेळी

नियम डावलून प्रदर्शन झाल्यास आमचा विरोध;भाजप जिल्हा उपाध्यक्ष रणजित देसाई यांचा इशारा ओरोस ता.०९-:* जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने १५ मे च्या दरम्यान आयोजित करण्यात येत असलेले “कृषि पशुपक्षी प्रदर्शन” चुकीच्या कालावधीत आणि चुकीच्या पद्धतीने आयोजित करण्यात येत आहे. याचा शेतकऱ्यांना फायदा होणार नाही. तरी हे प्रदर्शन नोव्हेंबर ते डिसेंबर या कालावधीत घेण्यात यावे. चुकीच्या पद्धतीने…

Read More

ओझर विद्यामंदिरमध्ये हस्ताक्षर कार्यशाळा संपन्न

*⚡मालवण ता.०९-:* मालवण तालुक्यातील कांदळगाव येथील ओझर विद्यामंदिरमध्ये शनिवार, रविवारी प्रशालेतील विद्यार्थ्यांसाठी हस्ताक्षर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. जिल्ह्यातील हस्ताक्षर तज्ज्ञ रोहित तांबे यांनी विद्यार्थ्यांना सुंदर हस्ताक्षर काढण्यासाठी मार्गदर्शन व कृतीयुक्त सराव करून घेतला. त्यात रेषा तंत्रज्ञान, अक्षरांचे वळण, शब्दांतील अंतर, अक्षरांची उंची, अक्षरांचा सारखेपणा इत्यादी बाबींवर विद्यार्थ्यांकडून सराव करून घेतला, तसेच हस्ताक्षर सुंदर येण्यासाठी…

Read More

धक्का मित्रमंडळातर्फे रक्तदान शिबिर

मालवण ता.०९-:* मालवण येथील धक्का मित्रमंडळ तर्फे दि. ११ मे रोजी सकाळी ९ ते दुपारी १ यावेळेत मामा वरेरकर नाट्यगृह येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. तरी रक्तदात्यांनी या शिबिरात सहभागी होऊन सहकार्य करावे, असे आवाहन धक्का मित्रमंडळातर्फे करण्यात आले आहे.

Read More

पोईप येथील श्री इश्वटी महापुरुष देवस्थान येथे विविध कार्यक्रम

मालवण ता.०९-:* पोईप येथील श्री इश्वटी महापुरुष देवस्थान येथे त्रैवार्षिक सत्यनारायण पूजा दि. १० मे रोजी आयोजित केली असून यानिमित्त विविध कार्यक्रम होणार आहेत. यावेळी दुपारी ३ वा. सत्यनारायण महापूजा, सायंकाळी ७ वा. श्री जैन रामेश्वर प्रासादिक भजन मंडळ चुनवरे तळेवाडी (बुवा महादेव बागवे) व जयशंभो प्रासादिक भजन मंडळ माजगाव सावंतवाडी (बुवा विजय माधव) यांची…

Read More

राज्यस्तरीय सेवासन्मान आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी शिवराज सावंत व संपदा बागी यांची निवड

मालवण ता.०९-:* महाराष्ट्र शिक्षक पँनल आयोजित राज्यस्तरीय सेवासन्मान आदर्श शिक्षक पुरस्कार २०२२ करीता सिंधुदुर्ग जिल्ह्यातून मालवण दांडी शाळेचे उपक्रमशील शिक्षक श्री. शिवराज सावंत व वैभववाडी कोकीसरे नारकरवाडी विद्यामंदिरच्या तंत्रस्नेही शिक्षिका श्रीमती संपदा बागी यांची निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र शिक्षक पँनल हा सुमारे पंचवीस हजार शिक्षकांशी संपर्क जोडणी असलेला तंत्रस्नेही उपक्रमशील शिक्षकांचा राज्यस्तरीय समुह आहे….

Read More

गाबीत समाज वधुवर मेळावा संपन्न …

अखिल भारतीय गाबीत समाज महासंघ आणि गाबीत समाज सिंधुदुर्ग च्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आयोजन कणकवली ता.०९-:* अखिल भारतीय गाबीत समाज महासंघ आणि गाबीत समाज सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने येथील” सुमनराज ट्रेड सेंटर टेरेस हॉल”येथे गाबीत समाज वधुवर मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी व्यासपीठावर अखिल भारतीय गाबीत समाज महासंघाचे अध्यक्ष माजी आमदार परशुराम उपरकर,जिल्हा…

Read More
You cannot copy content of this page