भोंगलेवाडी रस्त्याचे काम १० मे पूर्वी पूर्ण न केल्यास रास्ता रोको आंदोलन…

मसुरे युवासेना विभागप्रमुख राहुल सावंत यांचा इशारा

मालवण (प्रतिनिधी) गेली तीन वर्षे रेंगाळत सुरू असलेले बिळवस भोगलेवाडी रस्त्याचे काम ठेकेदाराने १० मे पुर्वी पूर्ण न केल्यास रास्ता रोको करून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा मसुरे युवासेना विभागप्रमुख राहुल सावंत यांनी दिल्यानंतर युवसेनेच्या या दणक्यामुळे अखेर संबंधित ठेकेदाराने या रस्त्याचे काम सुरू केले आहे.

कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या पाठपुराव्यामुळे बिळवस भोगलेवाडी रस्त्यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजना २०१८-१९ अंतर्गत १ कोटी ४५ लाख रु निधी मंजूर झाला आहे. बी. डी. पाटील या ठेकेदाराला सदर कामाचा ठेका मिळाला असून ७ जून २०१९ रोजी कामाला कार्यारंभ आदेश देण्यात आला आहे. मात्र आता ३ वर्षे होत आली तरी देखील काम पूर्ण करण्यात आले नव्हते तसेच याआधी केलेल्या उर्वरित रस्त्याचे काम देखील निकृष्ट दर्जाचे करण्यात आले आहे. त्यामुळे ठेकेदार आणि त्याला पाठीशी घालणारे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे अभियंता यांच्या विरोधात युवासेनेने आंदोलनाचा ईशारा दिला होता. युवासेनेच्या या दणक्यानंतर संबंधीत ठेकेदाराने सदर रस्त्याचे काम सुरू केले आहे. त्याबद्दल बिळवस भोगलेवाडी ग्रामस्थांनी राहुल सावंत आणि युवासेनेचे आभार मानले आहेत

You cannot copy content of this page