Headlines

शालेय बॉक्सिंग स्पर्धेत प्रज्वल केसरकरला विभागस्तरीय रौप्यपदक…

⚡बांदा ता.०३-: क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत सातारा येथे आयोजित ‘शालेय क्रीडा स्पर्धा 2026-27’ मधील शालेय बॉक्सिंग स्पर्धेत दिव्य ज्योती स्कूल, डेगवे प्रशालेच्या प्रज्वल प्रितेश केसरकर याने दैदिप्यमान यश संपादन केले आहे.

​प्रज्वलने ६६ ते ७० किलो वजन गटात उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत विभाग स्तरावर रौप्य पदक पटकाविले. त्याच्या या यशाबद्दल क्रीडा क्षेत्रातून व सर्व स्तरातून त्याचे कौतुक होत असून, त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.
प्रज्वलच्या या यशाबद्दल दिव्याज्योती स्कूल,डेगवेचे मुख्याध्यापक,क्रीडा शिक्षक,शिक्षकवृंद, विद्यार्थी व पालकांनी त्याचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
फोटो:-
पासपोर्ट.

You cannot copy content of this page