Headlines

सुधाताई कामत शाळेत अंगणवाडी सेविकांचा सन्मान…!

⚡सावंतवाडी ता.०३-: येथील सुधाताई कामत शाळा क्रमांक २ मध्ये ‘अंगण का उत्सव’ कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी अंगणवाडी सेविका अनुराधा पवार व मदतनीस अमिषा सासोलकर यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
सावंतवाडी भाजप शहराध्यक्ष तथा आरोग्य सभापती सुधीर आडिवरेकर, महिला शहराध्यक्ष व सभापती मोहिनी मडगावकर आणि महिला व बालकल्याण सभापती तथा कार्यक्रम संयोजिका दिपाली भालेकर यांच्या हस्ते अंगणवाडी सेविका व मदतनीसांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमानिमित्त उपस्थित विद्यार्थ्यांना पौष्टिक खाऊचे वाटपही करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिपाली भालेकर यांनी केले. यावेळी सभापती सुधीर आडिवरेकर, सभापती आनंद नेवगी, मोहिनी मडगावकर तसेच भाजप शहर सरचिटणीस दिलीप भालेकर यांनी मनोगत व्यक्त करून कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सुधीर आडिवरेकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
यावेळी सुधीर आडिवरेकर, आनंद नेवगी, दिपाली भालेकर, मोहिनी मडगावकर, शहर सरचिटणीस दिलीप भालेकर, उपसभापती सुनीता पेडणेकर, नगरसेविका नीलम नाईक, सुकन्या टोपले, मिसबा शेख, मेघना साळगावकर, मीना दाभोलकर, मेघना भोगटे, साक्षी गवस, तृप्ती विरनोडकर, ज्योती मुद्राळे, रूपाली रेमुळकर, शाळा क्रमांक २ चे मुख्याध्यापक अंजीवडेकर सर, अंगणवाडी सेविका अनुराधा पवार, मदतनीस अमिषा सासोलकर यांच्यासह पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You cannot copy content of this page