खैदा विठ्ठल रखुमाई मंदिराचा उद्या वर्धापन दिन सोहळा

मालवण ता.०९-:* मालवण तालुक्यातील खैदा येथील श्री विठ्ठल रखुमाई मंदिराचा आठवा वर्धापन दिन सोहळा मंगळवार दि. १० मे रोजी साजरा होणार आहे. यानिमित्त सकाळी ९ वा. श्री विठ्ठल रखुमाईला अभिषेक, सकाळी ११ वा. सत्यनारायण महापूजा, दुपारी १ वा. दिंडी प्रदक्षिणा, १.३० वा. महाप्रसाद, सायंकाळी ५ वा. स्थानिक भजने, सायंकाळी ६.३० वा. महिला वारकरी भजन तर रात्री ९.३० वा. दशावतार नाट्य प्रयोग सादर होणार आहे.

तरी सर्वानी उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन खैदा ग्रामस्थ मंडळ यांनी केले आहे.

You cannot copy content of this page