अल्पभूधारक शेतक-यांसाठी किमान हमीभाव कायदा होणे आवश्यक-राजू शेट्टी
*⚡वेंगुर्ला ता.१०-:* भारत हा कृषिप्रधान देश आहे. भारतातील ६२ टक्के लोकांचे जीवन प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे शेतीवर अवलंबून आहे. त्यामुळे शेतक-यांच्या प्रश्नावर गांर्भियाने विचार करण्याची गरज आहे. आज कोकणात ८० टक्के शेतकरी अल्पभूधारक आहेत. या ८० टक्के लोकांना डोळ्यासमोर ठेवून धोरण ठरविणे गरजेचे आहे. असंघटीत मजुरांसाठी ज्याप्रमाणे किमान वेतन कायदा आहे. त्याच धर्तीवर अल्पभूधारक शेतक-यासांठी किमान हमीभाव…
