रोणापाल कुळकार देवाचा बुधवारी वर्धापनदिन सोहळा

बांदा ता.१०-:* रोणापाल – देऊळवाडी येथील कुळकार देवाचा वर्धापनदिन सोहळा बुधवार ११ मे रोजी साजरा होत आहे. त्यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ९ वाजता वास्तुशांती व सत्यनारायण महापूजा, दुपारी आरती, तीर्थप्रसाद व महाप्रसाद होईल. सायंकाळी श्री देवी माऊली भजन मंडळाचे बुवा शंकर गावडे यांचे भजन व रात्री बाळकृष्ण गोरे दशावतार नाट्यमंडळाचा नाट्यप्रयोग होणार आहे. भाविकांनी या सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन गावडे बंधूंकडून करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page