गगनबावडा येथील एकाला १० वर्षे सश्रम कारावास
*⚡ओरोस ता.१०-:* अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेत लग्नाचे आमिष दाखवत लैगिक अत्याचार करणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावडा येथील एकाला न्यायालयाने १० वर्षे सश्रम कारावास व सहा हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे..विशेष न्यायाधीश आर बी रोटे यांनी ही शिक्षा सुनावली असून अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील रुपेश देसाई यांनी सरकारी पक्षाच्यावतीने काम पाहिले.
