अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाच्या शास्त्रीय गायन परीक्षेत दिप्तेश मेस्त्री प्रथम श्रेणीत उत्तीर्ण…

सावंतवाडी ता 10: अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालया कडून घेण्यात आलेल्या शास्त्रीय गायन परिक्षेमध्ये अणसुर येथील भजनकार संगीतकार दिप्तेश मेस्त्री यांनी शास्त्रीय गायन या विभागातून संगीत अलंकार ही पदवी प्रथम श्रेणीत प्राप्त केली आहे. पणजी गोवा येथील रमेश सुखटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली जयपूर आग्रा आदी घराण्यांच्या घरंदाज गायकीचे शिक्षण घेत त्यांनी ही पदवी संपादन केली त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

श्री मेस्त्री यांनी २००६ सालापासून शास्त्रीय गायनाचे शिक्षण घेण्यास सुरुवात केली जिल्ह्यात आणि जिल्ह्याबाहेर जवळजवळ ५०० हून अधिक भजन स्पर्धांमध्ये भाग घेऊन त्यांनी प्रत्येक स्पर्धेमध्ये प्रथम द्वितीय तृतीय पारितोषिक प्राप्त केले आहेत गेली १२ वर्षांपासून त्यांनी जिल्ह्यातील विविध भागात भजन,गायन, शास्त्रीय गायनाचे वर्ग सुरू केले आहेत. त्यांनी गुरूकुल ही संगीत अकॅडमी सुरू केली असून त्याद्वारे ते घरंदाज गायकी शिकवतात अनेक शिष्य त्यांच्या अखंड गायन सत्र या माध्यमाद्वारे गायन शिकत आहेत संगीत कलेचा प्रचार आणि प्रसार व्हावा हा त्यांचा मानस आहे त्यांचे अनेक शिष्य त्यांच्या पाठोपाठ विविध स्पर्धांमध्ये भाग घेऊन नावलौकिक कमावत आहेत

आरवली वेंगुर्ले येथील ज्येष्ठ गायक, कीर्तनकार श्रीराम दीक्षित यांच्याकडे गायनाचे प्रारंभिक धडे गिरविल्यानंतर त्यांनी ओल्ड गोवा येथील सुप्रसिद्ध गायक कै. बाळकृष्ण केळकर यांच्याकडे संगीत विशारद पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले त्यानंतर पणजी गोवा येथील पंडित जितेंद्र अभिषेकी यांचे ज्येष्ठ शिष्य रमेश सुखटणकर यांच्याकडून जयपूर, आग्रा आदी घराण्यांच्या घरंदाज गायकीचे शिक्षण घेत गुरूकुल पद्धतीने रियाझ करून संगीत अलंकार ही पदवी संपादन केली श्री मेस्त्री आपल्या या यशाचे श्रेय आपले आई वडील, गुरु, पत्नी, आणि समस्त ज्येष्ठ कनिष्ठ कलाकारांना देतात त्यांच्या या यशाबद्दल समाजातील विविध स्तरातून कौतुक होत आहे

You cannot copy content of this page