Headlines

कुस्ती स्पर्धेत न्यू इंग्लिश स्कूल पेंडूरचा आरव पाटील जिल्ह्यात प्रथम

मालवण दि प्रतिनिधी
क्रीडा व युवक संचलनालय पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद सिंधुदुर्ग आणि जिल्हा क्रीडा अधिकारी सिंधुदुर्ग यांच्यावतीने ओरोस येथे घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत १४ वर्षाखालील ३५ किलो वजनी गटात न्यू इंग्लिश स्कूल पेंडूरचा विद्यार्थी आरव दत्तात्रय पाटील याने दमदार कामगिरी करत जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला. या यशामुळे आरवची सातारा येथे होणाऱ्या विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे.आरोवच्या या उल्लेखनीय यशामुळे न्यू इंग्लिश स्कूल पेंडूरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.

कुस्ती स्पर्धेत आरवने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत प्रतिस्पर्ध्यांवर मात केली. त्याच्या मेहनत, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर मिळविलेल्या या यशाबद्दल माध्यमिक शिक्षण संस्था पेंडूर तसेच न्यू इंग्लिश स्कूल पेंडूरच्या वतीने त्याचे अभिनंदन करण्यात आले. यावेळी आरवचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
आरवच्या यशामध्ये त्याची सातत्यपूर्ण मेहनत, जिद्द, चिकाटी तसेच प्रशिक्षक आणि मार्गदर्शकांचे मोलाचे योगदान आहे.

या यशाबद्दल आरवचे संस्था अध्यक्ष श्री. बाबाराव राणे, सचिव श्री. घनश्याम राणे, संस्था संचालक श्री. सदाशिव परब, श्री. सुभाष सावंत, श्री. प्रदीप सावंत,श्री. अनिल सावंत, श्री. आतिक शेख, श्री. सत्यवान सावंत, श्री. संतोष पवार, श्री. विजय गावडे, मुख्याध्यापक श्री. सुरेश तावडे, आजी-माजी विद्यार्थी, ग्रामस्थ, पालक, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे

You cannot copy content of this page