Headlines

लोकमान्य टिळकांचे विचार समाजासाठी प्रेरणादायी…

नगरसेवक रुपेश नार्वेकर:कणकवली नगरपंचायत येथे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक जयंती साजरी..

⚡कणकवली ता.२३-: लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी स्वराज्याची संकल्पना जनतेपर्यंत पोहोचवून देशात राष्ट्रप्रेमाची ज्योत प्रज्वलित केली. समाजाला एकत्र आणत शिक्षण, स्वाभिमान आणि सामाजिक जागृतीचा त्यांनी दिलेला संदेश आजही तितकाच प्रेरणादायी आहे. त्यांच्या विचारांचे स्मरण केवळ जयंतीपुरते मर्यादित न ठेवता ते आपल्या दैनंदिन जीवनात आणि समाजकार्यात आचरणात आणणे आवश्यक आहे. युवकांनी लोकमान्यांच्या कार्यातून प्रेरणा घेत राष्ट्रनिर्मितीत सक्रिय सहभाग नोंदवावा, हीच त्यांच्या जयंतीनिमित्त खरी आदरांजली ठरेल, असे प्रतिपादन नगरपंचायत चे नगरसेवक तथा गटनेते रुपेश नार्वेकर यांनी केले.

यावेळी नगरपंचायत कर्मचारी अमोल अघम, विभव करंदीकर, ध्वजा उचले, अक्षता रोळे, माधुरी डगरे, सुमित कुबल, प्रशांत राणे, नेहा तळेकर, प्रवीण गायकवाड, महेश राणे, मनोज तोरसकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमात लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

दरम्यान उपस्थित मान्यवरांनी देखील लोकमान्य टिळक यांच्या स्वातंत्र्यलढ्यातील मोलाच्या योगदानाचे स्मरण करत त्यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचा संकल्प व्यक्त केला.

You cannot copy content of this page