युवराज लखमराजे यांनी दिली संजू परब यांच्या घरी भेट

अलीकडेच युवराज लखमराजे भोसले यांनी केला होता भाजप प्रवेश

सावंतवाडी ता.१०-:* भाजप मध्ये प्रवेश केलेल्या सावंतवाडी राजघराण्याचे युवराज लखमराजे भोसले यांनी आज सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी परब कुटुंबियांकडून त्यांचे स्वागत करण्यात आले.

यावेळी माजी नगरसेवक मनोज नाईक, आनंद नेवगी, दिपाली भालेकर, राजू बेग, बंटी पुरोहित, दिलीप भालेकर, दीना नाईक, संजना परब आदी पदाधिकारी उपस्थित होते.

You cannot copy content of this page