चारचाकीने हुल दिल्याने दुचाकी चालकाचा अपघात…

दुचाकी चालक किरकोळ जख्मी; दुचाकी आंबा विक्री स्टॉल मध्ये गेल्याने नुकसान…

सावंतवाडी ता 10: जुना मुबई गोवा महामार्गावरून सावंतवाडीच्या दिशेने येणाऱ्या दुचाकीस्वाराला चारचाकीने हुल दिल्याने तो आंबा विक्रेत्याच्या दुकानाला आढळून अपघात झाला हा अपघात आज सायंकाळच्या सुमारास माजगाव येथील साधले वडापाव परिसरात घडला यात दुचाकीस्वाराच्या पायाला किरकोळ दुःखापट झाली असून आंबा विक्रेत्याचे देखील नुकसान झाले नुकसान भारपाईच्या वादातून हा प्रकार अखेर पोलीस स्थानकापर्यंत जाऊन पोचला

दुचाकी चालक हा जुना मुबई गोवा महामार्गावरून सावंतवाडीच्या दिशेने येत होता यावेळी तो माजगाव येथील साधले वडापाव सेंटर परिसरात आला असता त्याला चारचाकी चालकाने हुल दिली यावेळी होणारा अपघात टाळण्यासाठी त्याने आपली दुचाकी रस्त्याच्या कडेला घेतली असता रस्त्याच्या कडेलाच असणाऱ्या आंबा विक्रेत्याच्या स्टॉलला दुचाकी आढळून अपघात झाला यात दुचाकी चालक खाली कोसळत त्याच्या पायाला किरकोळ दुःखापत झाली आंबा विक्रेत्याचे आंबे रस्त्यावर सैरावैरा पसरले तर त्या दुकानातील टेबल तुटून आंबा विक्रेत्याचे नुकसान झाले यानंतर नुकसान भरपाईच्या वादातून हे प्रकरण अखेर पोलीस ठाण्यात येऊन पोचले उशिरा पर्यंत यावर चर्चा सुरू होती

You cannot copy content of this page