*⚡मालवण ता.०९-:* मालवण तालुक्यातील कांदळगाव येथील ओझर विद्यामंदिरमध्ये शनिवार, रविवारी प्रशालेतील विद्यार्थ्यांसाठी हस्ताक्षर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. जिल्ह्यातील हस्ताक्षर तज्ज्ञ रोहित तांबे यांनी विद्यार्थ्यांना सुंदर हस्ताक्षर काढण्यासाठी मार्गदर्शन व कृतीयुक्त सराव करून घेतला.
त्यात रेषा तंत्रज्ञान, अक्षरांचे वळण, शब्दांतील अंतर, अक्षरांची उंची, अक्षरांचा सारखेपणा इत्यादी बाबींवर विद्यार्थ्यांकडून सराव करून घेतला, तसेच हस्ताक्षर सुंदर येण्यासाठी करावा लागणारा सराव आणि इतर क्लृप्त्यांविषयी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासासाठी आणि शाळेचा दर्जा उंचावण्यासाठी प्रशालेत यापुढेही अनेक नवनवीन उपक्रम व मार्गदर्शनपर शिबिरांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे मुख्याध्यापक पी. आर खोत यांनी सांगितले.
