श्री देवी घुमडाईचा ११ वा वर्धापनदिन सोहळा उत्साहात साजरा…

मालवण दि प्रतिनिधी मालवण तालुक्यात डोंगर कुशीत वसलेल्या निसर्गसंपन्न घुमडे गावातील श्री देवी घुमडाई मंदिर मूर्तीप्राणप्रतिष्ठापना व जीर्णोद्धार दिनाचा ११ वा वर्धापनदिन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या सोहळ्यास रविवारी भाजप प्रदेश सचिव माजी खासदार निलेश राणे यांनी उपस्थित राहून देवीचे दर्शन घेतले. ‘निलेश राणे मालवण कुडाळ मतदारसंघातुन मोठ्या मताधिक्याने आमदार होऊदे’ असे गाऱ्हाणे उपस्थित गावकरी यांनी देवी चरणी घातले.

यावेळी निलेश राणे यांचा विशेष सत्कारही करण्यात आला. यावेळी प्रदीप बिरमोळे, महादेव बिरमोळे, सुरेश बिरमोळे, विष्णू बिरमोळे यासह भाजप जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, जिल्हा बँक संचालक बाबा परब, भाऊ सामंत, घुमडे सरपंच दिलीप बिरमोळे, उपसरपंच राजेश सावंत, अमोल केळुसकर, उमेश बिरमोळे, माजी नगरसेवक दीपक पाटकर, आबा हडकर, राकेश सावंत, बाळू राणे, सूर्यकांत बिरमोळे व अन्य उपस्थित होते. फोटो : घुमडे येथील श्री घुमडाई देवीचे दर्शन घेताना भाजप प्रदेश सचिव माजी खासदार निलेश राणे, सोबत अशोक सावंत व अन्य.

You cannot copy content of this page