पोईप येथील श्री इश्वटी महापुरुष देवस्थान येथे विविध कार्यक्रम

मालवण ता.०९-:* पोईप येथील श्री इश्वटी महापुरुष देवस्थान येथे त्रैवार्षिक सत्यनारायण पूजा दि. १० मे रोजी आयोजित केली असून यानिमित्त विविध कार्यक्रम होणार आहेत. यावेळी दुपारी ३ वा. सत्यनारायण महापूजा, सायंकाळी ७ वा. श्री जैन रामेश्वर प्रासादिक भजन मंडळ चुनवरे तळेवाडी (बुवा महादेव बागवे) व जयशंभो प्रासादिक भजन मंडळ माजगाव सावंतवाडी (बुवा विजय माधव) यांची भजने सादर होणार आहेत.

तर रात्री ९ वा. अष्टविनायक नाट्यमंडळ निरवडे यांचा प्रतिशोध दशावतारी नाट्यप्रयोग सादर होणार आहे. तरी भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक माधव हितवर्धक मंडळ, पोईप वरची माधववाडी यांनी केले आहे.

You cannot copy content of this page