मालवणात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा
⚡मालवण ता.१५-: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा ५४ वा वाढदिवस मालवण ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना फळ वाटप कार्यक्रम करून साजरा करण्यात आले तर मालवण मेढा येथील फतिमा आश्रम मधील लहान मुलांच्या हस्ते वाढदिवसाचा केक कापून साजरा करण्यात आला.यावेळी शाळेमध्ये शिकत असलेल्या मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले
