काँग्रेस तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर आणि सहकाऱ्यांचा पुढाकार
सावंतवाडी : भटवाडी येथील राजश्री यशवंत राणे हि वयोवृद्ध महिला निराधार होती. कोरोनाकाळात तिच्या मुलांचं निधन झाल, तर याचवर्षी दुसरा मुलगा देखील निधन पावला. त्यामुळे एकटेपणाच जीवन या वृद्ध महिलेच्या वाट्याला आल. हि बाबा समजताच सामाजिक कार्यकर्ते, कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पुढाकार घेतला.
त्या निराधार वृद्धेला निवारा देत आधार दिला. यावेळी महेंद्र सांगेलकर, बबन डिसोझा, बबलू डिसोझा, सड्रीक डिसोझा, रविंद्र नाईक यांनी आर्थिक मदत करत त्या महिलेच घर उभं केल. त्यांच्या या कार्यांच सर्वत्र कौतुक होत आहे.
