नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या हस्ते सरबत घेत अण्णा कोदे यांनी सोडले उपोषण
⚡कणकवली ता.१५-: कणकवली शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा स्थलांतरण संदर्भात भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात बेमुदत उपोषण छेडल्याच्या पहिल्या दिवशी कणकवली तहसीलदार आर.जे.पवार यांनी दिलेल्या लेखी आश्वासनानंतर नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या हस्ते सरबत घेत शहराध्यक्ष अण्णा कोदे यांनी हे उपोषण मागे घेतले. प्रशासनाने राज्य शासनाचे अवर सचिव यांच्याकडे पुतळा स्थलांतरण संदर्भात शिफारस केली असल्याचे लेखी आश्वासन दिले. त्यानंतर हे उपोषण मागे घेण्यात आले.
कणकवली प्रांताधिकारी यांनी राज्य शासनाचे अवर सचिव यांच्याकडे पुतळा स्थलांतरण संदर्भात शिफारस केली आहे.तातडीने या विषयावर तोडगा काढला जाईल, असे लेखी आश्वासन दिल्यानंतर भाजपाने हे उपोषण मागे घेतले. सकाळपासूनच भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी उपोषणस्थळी भेट देत पाठिंबा दिला. शिवसेनेचे ग्रामपंचायत सदस्य असलेले विनायक उर्फ बाळू मेस्त्री यांनी देखील उपोषणस्थळी भेट देत दिलेला पाठिंबा चर्चेचा विषय ठरला.
यावेळी भाजपा शहराध्यक्ष अण्णा कोदे, प्राची कर्पे, प्रज्ञा ढवण, मेघा गांगण, राजश्री धुमाळे, साक्षी वाळके, पप्पू पुजारे, शिवसुंदर देसाई, अभय घाडीगावकर, संदीप सावंत, राजू हिर्लेकर, राजन चिके, महेश सावंत, अभिजीत मुसळे, बंडू गांगण, संजय ठाकूर, भाई आंबेलकर, शिशीर परुळेकर, सिद्धेश वालावलकर, संदीप मेस्त्री, बाळा पाटील, आनंद पारकर, स्वप्नील चिदरकर, राजू गवाणकर, महेश नार्वेकर, राजा पाटकर, राजू पेडणेकर, सोनू भंडारी,गणेश तळगावकर, नऊ झेमने, भाजपा तालुकाध्यक्ष संतोष कानडे, माजी सभापती मनोज रावराणे, नायब तहसीलदार शिवाजी राठोड आदी उपस्थित होते.
उपोषणानंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना भाजप कणकवली शहराध्यक्ष अण्णा कोदे म्हणाले,पालकमंत्री यांनी जनतेला दिलेला शब्द पाळावा .तहसीलदार यांनी दिलेल्या पत्रानुसार आता जरी आम्ही उपोषण मागे घेत असलो तरी स्थलांतर लवकरात लवकर न झाल्यास पुन्हा उपोषणाचे हत्यार आमदार नितेश राणे व नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या नेतृत्वाखाली उभारले जाईल असा इशारा यावेळी अण्णा कोदे यांनी दिला.