कळसुली हर्डी येथील अंगणवाडी इमारतीचे उदघाटन

⚡कणकवली ता.१५-: कळसुली हर्डी येथील अंगणवाडी क्र.७०२ इमारतीचे उदघाटन ज्येष्ठ नागरिक गंगाराम खरात यांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाची सुरवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली.विद्यमान जि.प सदस्य – सौ.सायली सावंत यांच्या फंडातून तसेच प.स.- सौ. सुचिता दळवी.मिलिंद मेस्त्री यांच्या माध्यमातून अंगणवाडी इमारत उपलब्ध करण्यात आली.

ग्रामपंचायत सरपंच सौ.साक्षी परब उपसरपंच सचिन पारधिये.सदस्य सौ. श्रृती नार्वेकर , प्रगती भोगले ,किशोर घाडीगांवकर, माजी ग्रामपंचायत सदस्य अरुण दळवी, पत्रकार प्रतिनिधी हेमंत वारंग उपस्थित होते.
प्रस्ताविक विकास अधिकारी श्री.तेंडुलकर यांनी केले.सरपंच आणि उपसरपंच यांनी मनोगत व्यक्त केले.अंगणवाडी नुतन इमारतीचे उद्घाटन ज्येष्ठ नागरिक गंगाराम खरात यांच्या हस्ते करण्यात आले.श्री. सुद्रिक यांनी अंगणवाडी साठी सिलिंग फॅन भेट वस्तू दिली.
तसेच कळसुलीच्या सर्व अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत कर्मचारी,ग्रामस्थ बाळकृष्ण खरात, सुरेश घोगळे, प्रविण दळवी, नंदु तेली स्थानिक पालकवर्ग महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.सुऋसंचालन व आभार बुधाजी घाडीगांवकर यांनी केले.

You cannot copy content of this page