Headlines

वैभववाडी येथील आनंदीबाई रावराणे कॉलेजमध्ये रोजगार मेळावा

सिंधुदुर्गनगरी, दि. 17 (जि.मा.का):- जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र तथा मॉडेल करिअर सेंटर, सिंधुदुर्ग आणि आनंदीबाई रावराणे आर्टस, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, वैभववाडी यांच्या संयुक्त विद्यमाने स्थानिक युवकांना रोजगारांच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी दिनांक २० जुलै रोजी सकाळी १० ते सायं. ४ या वेळेत भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा आनंदीबाई रावराणे आर्टस, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज,वैभववाडी येथे आयोजित करण्यात आलेला आहे.

या मेळाव्यामध्ये विविध नामांकित कंपन्यांचा सहभाग असून १५० पेक्षा अधिक रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

या मेळाव्यात Axis Bank, ICICI BANK, NIIT LTD, TATA AIA अशा नामांकित बँका करिता रोजगार संधी उपलब्ध असून यासाठी १० वी १२वी/ कोणत्याही शाखेतील पदवीधर उमेदवारांसाठी विविध क्षेत्रांमध्ये भरती केली जाणार आहे.

उमेदवारांचा कल विशेषतः मुंबई, पुणे, ठाणे व इतर बँकीग क्षेत्रांमध्ये नोकरी करण्याकडे असल्याने त्यानुसार रोजगाराच संघी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत, तसेच स्वयंरोजगारासाठी इतर शासकीय कर्ज महामंडळे, जिल्हा उद्योग केंद्र व इतर योजनां माहिती देण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील जास्तीत जास्त पात्र व इच्छुक उमेदवारांनी या रोजगार मेळाव्यास उपस्थित राहताना आपला बायोडाटा तसेच आवश्यक कागदपत्रे (शैक्षणिक प्रमाणपत्रे, ओळखपत्र इ.) सोबत आणावीत.

या रोजगार मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहून उपलब्ध रोजगार संधींचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौश विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सिंधुदुर्ग यांच्या कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी यांनी आहे.

00000

You cannot copy content of this page