वरद पंतवालावलकर राज्यात ६३ वा तर ओवी आडेलकर ६४ वी
सावंतवाडी : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या इयत्ता पहिलीच्या बीटीएस परीक्षेत शारदा विद्यालय मळगाव रस्ता शाळेच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. विद्यालयातील वरद महेश पंतवालावलकर याने राज्यात ६३ वा, तर ओवी प्रसाद आडेलकर हिने ६४ वा क्रमांक पटकावत शाळेच्या शैक्षणिक यशात मानाचा तुरा रोवला आहे.
दोन्ही विद्यार्थ्यांनी १५० पैकी ११८ गुण मिळवत राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत स्थान मिळविले. या विद्यार्थ्यांना राजश्री शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे शाळेचे मुख्याध्यापक दत्तगुरु कांबळी, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रंजना तेली, उपाध्यक्ष महेश पंतवालावलकर, सदस्य अमित गावकर, शिक्षिका सीमा सावंत, अस्मिता गोवेकर, पालकवर्ग यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
